नगराध्यक्षपदाच्या महायुतीचे उमेदवार अँड मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते (फोटो - टीम नवराष्ट्र)
Maharashtra Local Body Elections : वडगाव मावळ: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका पार पडत आहे. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष नेत्यांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. वडगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला.
भाजप–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्यासह 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेत आणि नारळ फोडून प्रचार मोहिमेला प्रारंभ झाला. त्यानंतर खंडोबा मंदिरापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी, भगवे झेंडे आणि शेकडो कार्यक्रमांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. हजारो महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती ही या रॅलीची खास वैशिष्ट्य ठरली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण यांचे भाषण
वडगाव मावळमध्ये जोरदार प्रचार सुरु झाला. यासाठी महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन करताना उमेदवारांचे मनोबल वाढवले. त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की, “भ्रष्टाचारमुक्त वडगावसाठी भाजपाशिवाय पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये परिवर्तनाची नवी पहाट उगवेल,”असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. वडगाव आणि डोंबिवलीमधील विशेष नात्याची आठवण करून देत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना भरभरून प्रोत्साहन दिले आणि संघटनेच्या ताकदीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगराध्यक्षपदासाठी ‘म्हाळसकर विरुद्ध ढोरे’ ?
नगराध्यक्ष पद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रमुख राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा या पदावर लागणार आहे.म्हाळसकर कुटुंबातील मृणाल गुलाबराव म्हाळसकर (२ अर्ज), सुनंदा गुलाबराव म्हाळसकर, सायली रुपेश म्हाळसकर या तिघींनी दाखल केलेल्या अर्जांमुळे घराण्यातील अंतर्गत शक्तीपरीक्षेची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
मतदार जनजागृती जोमदार — SVEEP उपक्रम रंगात
मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी नगरपंचायतीने SVEEP मोहिमेला मोठा वेग दिला आहे. LED स्क्रीन व्हॅन, विद्यार्थी प्रतिज्ञा, गर्दीच्या ठिकाणी जनजागृती यामुळे शहरभर निवडणुकीचे वातावरण भारावून गेले आहे.






