• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Eknath Shinde Assures Mumbai Residents That He Will Make Mumbai A World Class Fintech Hub

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2026 | 07:27 PM
मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

“आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्जमुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

तसेच  मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाहन या संगीतमय पट्ट्यांवरून धावत स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील लोकप्रिय ‘ जय हो’ गाण्याच्या संगीताचा आवाज ऐकू आल्यावर त्यांच्या समवेत वाहनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे , मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे. ही अभिनव संकल्पना आहे. वाहनचालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर ५०० मीटर लांब विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत.

Mumbai High Court: महात्मा गांधींवर निबंध लिहिणाऱ्या बलात्काराच्या दोषीची शिक्षा कमी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खळबळ

Web Title: Eknath shinde assures mumbai residents that he will make mumbai a world class fintech hub

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा
1

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?
2

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत
3

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?
4

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Feb 11, 2026 | 09:07 PM
देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

देशातील पहिला ‘मुंबई क्लायमेट वीक’ १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान मुंबईत!

Feb 11, 2026 | 08:55 PM
ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

ENG vs WI, T20 World Cup 2026 : रदरफोर्डसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल! वेस्ट इंडिजचे इंग्लिश संघासमोर 197 धावांचे लक्ष्य 

Feb 11, 2026 | 08:47 PM
IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

Feb 11, 2026 | 08:32 PM
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Feb 11, 2026 | 08:32 PM
“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

Feb 11, 2026 | 08:31 PM
Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Feb 11, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.