'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती
सातारा : महाबळेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महापर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली. त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार तथा मदत, पुनर्वसनमंत्री मकरंद पाटीलही कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पर्यटन महोत्सवाकडेच पाठ फिरवल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राचं ‘मिनी काश्मीर’ अर्थात महाबळेश्वर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुका. महाबळेश्वरपासून काही किलोमीटर अंतरावर त्यांचं दरे गाव आहे. त्यामुळं महापर्यटन महोत्सवाच्या नियोजनात शिंदे गटाचाच वरचष्मा दिसून आला. पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई हे महोत्सवाच्या नियोजनात आघाडीवर होते. महाबळेश्वर तालुका हा वाई मतदारसंघात असताना स्थानिक आमदार, मंत्री मकरंद पाटील यांना नियोजनात कुठेही स्थान नव्हतं. त्यामुळं राष्ट्रवादीला डावललं गेल्याची भावना अजितदादांच्या गटात दिसून येत आहे.
अजित पवार हे शुक्रवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये होते. त्यांचा कार्यक्रम दुपारी संपला. त्यामुळं सायंकाळी होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला ते हजर राहतील, असं वाटत होतं. मात्र, त्यांनी दांडी मारली. महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.४) होत आहे. मात्र, अजितदादांचा रविवारचा महाबळेश्वर दौराही कन्फर्म नसल्याची माहिती समोर येत आहे.
पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावी मुक्कामी आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर हेलिकॉप्टरने त्यांनी दरे गाव गाठलं. रविवारी समारोपापर्यंत ते महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. त्यामुळं तीन दिवस त्यांचा मुक्काम दरे गावात असणार आहे.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी या पर्यटन महोत्सवाचा महाबळेश्वर समारोप होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हे उपस्थित राहतात का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.