Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नाईट लाईफ’ वाल्याच्या हाती स्टेअरिंग देत भल्या सकाळी पवारांचे मॉर्निंग वॉक! : गरमागरम राजकीय चर्चांना समूह माध्यमांत उधाण!

आज भल्या सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य मुंबईत एकाच गाडीतून प्रवास करत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरेंनी केले.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 11, 2022 | 03:59 PM
‘नाईट लाईफ’ वाल्याच्या हाती स्टेअरिंग देत भल्या सकाळी पवारांचे मॉर्निंग वॉक! : गरमागरम राजकीय चर्चांना समूह माध्यमांत उधाण!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या (BMC Election) दृष्टीने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुबईच्या विकास योजनांच्या पूर्णत्वाकडे विशेष लक्ष दिले आहे.

आज भल्या सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यावरण मंत्री आदित्य मुंबईत एकाच गाडीतून प्रवास करत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरेंनी केले. तर कामांची पाहणी करताना आदित्य ठाकरेंचे कौतुक करत अजित पवारांनी त्यांच्या घड्याळ निशाणी प्रमाणे भल्या सकाळीच मुंबईतील अधिकाऱ्यांना सूचना करत आपल्या प्रशासकीय नजरेतून अनेक महत्वाच्या सूचना केल्या.

[read_also content=”Shocking! पॅराग्लायडिंग दरम्यान झाला घात, तो हवेत लटकत राहिला; व्हिडिओ पाहून तुम्हीही घाबरून जाल https://www.navarashtra.com/viral/man-hanging-on-to-paraglider-viral-video-will-shock-you-know-the-details-in-marathi-nrvb-236414.html”]

पहिल्यांदाच भल्या सकाळी मुंबईत दौरा

पुण्यात किंवा मुंबईत असले तरी अजित पवारांचा दिवस भल्या सकाळी सहा वाजता सुरू होतो. ते नेहमीच सकाळच्या वेळेत विकासकामांचा आढावा घेत असतात. यावेळी नाईट लाईफचा आग्रह असलेल्या अदित्य ठाकरे यांच्या सोबत अजित दादांनी पहिल्यांदाच भल्या सकाळी मुंबईत महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी, धोबी तलाव याठिकाणी जाऊन विकास कामांची पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांचे सोबत  फिरतानाचे छायाचित्र समूह माध्यमांवर भाव खावून जात आहेत. यावेळी काही सूचक पोजवर नेटकरी व्यक्त झाले आहेत.

पवारांनी केले आदित्य ठाकरेंचे कौतुक

मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी हेरिटेज वॉकची सुरुवात केली होती. तेव्हासुद्धा अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले होते. ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या दौऱ्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे मुहूर्त सांगणा-या भाजप नेत्यांना अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या एकत्रित विकासकामांची पाहणी दौऱ्याने भल्या सकाळच्या त्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा भल्या सकाळी नवे राजकीय समिकरण दिसल्याचे मानले जात आहे.

[read_also content=”ठप्प झाली एअरटेलची सेवा; युजर्स भडकले, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची झाली पंचाईत https://www.navarashtra.com/technology/airtel-4g-wifi-network-down-airtel-internet-users-faces-major-outage-across-india-nrvb-236494.html”]

स्टेअरिंग ठाकरेंच्या नव्या पिढीकडे

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार यांनी कारचे सारथ्य केले होते. तेव्हा आमच्या सरकारचे स्टेअरिंग अजित पवार यांच्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हटले होते. मात्र आता आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या नव्या पिढीकडे गेल्यास त्यालाही अजित पवारांचा विरोध नसेल असा संदेश राजकीय वर्तुळात गेल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Ajit pawar and aditya thackeray traveling in the same vehicle for development work in worli constituency nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 03:56 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Development Work

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
4

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.