Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासनाच्या आजपर्यंतच्या कामकाजात सांगली जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हटले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 16, 2025 | 09:43 PM
We will provide all possible cooperation for the overall development of Sangli district: Deputy Chief Minister Ajit Pawar

We will provide all possible cooperation for the overall development of Sangli district: Deputy Chief Minister Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगली जिल्हा हा नेतृत्त्व करण्यास संधी देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक मान्यवरांना नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामकाजात या जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. त्यांना प्रशासनाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य सर्वतोपरी करू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

सांगली जिल्ह्यातील विविध विकासकामे तथा योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि सत्यजीत देशमुख तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा : Devendra Fadnavis: “दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी…”; CM देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार

ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा. त्याचा फळ उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूचित करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, केळी निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने द्राक्ष निर्यातीसाठी रेसिड्यू लॅबसाठी कृषि विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी यशस्वी प्रयोग झाले आहेत. पाणी, खत बचत आणि जास्त टनेज यासाठी एआयचा चांगला उपयोग होतो. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

रांजणीचे प्रस्तावित ड्राय पोर्ट, सलगरेचे मल्टीमोडल लॉजस्टिक पार्क, शक्तीपीठ महामार्ग आदि प्रश्नी योग्य तो मार्ग काढू, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य कामांवर व विहित वेळेत खर्च करावा. निधीचा अपव्यय होणार नाही, कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष द्यावे. तसेच, जिल्हा नियोजन समितीमधून स्थानिक स्वराज्य सस्थांना मिळणारा निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून, 150 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे, असे सांगून सांगली महानगरपालिका इमारतीसाठी निधी, महापालिका क्षेत्रात पीएम ई बस चार्जिंग स्टेशन, नाट्यगृह व ऑडिटोरियम आदिंबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाशी संबंधित प्रश्नांची नोंद घेऊन, ते मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेथे उच्चस्तरअधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे तात्काळ संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्याचे सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, कृषि सिंचन व उत्पादन, औद्योगिक व आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, प्रलंबित कामे व अपेक्षा, पर्यटन, पूरनियंत्रण, आरोग्य, विद्युत, सौर प्रकल्प, रोजगार निर्मिती, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, सांगली जिल्ह्यातील लोकांच्या प्रमुख अपेक्षा, अडचणींवर मात करण्याच्या उपाययोजना आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त अनुदान व प्रत्यक्ष खर्च, मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी व फलनिष्पत्ती, केंद्र व राज्य आवास योजना, जल जीवन मिशन, घरगुती नळ जोडणी, आरटीई प्रवेश व प्रतिपूर्ती आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले. महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, फिश मार्केट बांधणे, काळीखण येथे सुशोभिकरण, कुपवाड वारणाली येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित करणे, पी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत बस टर्मिनस बांधणे, सांगली हनुमाननगर येथे महानगरपालिकेचे नाट्यगृह व बहुउद्देशीय हॉल बांधणे, महापालिकेचे व्यापारी संकुल व प्रसूतिगृह इमारत बांधणे, महापालिका क्षेत्रात जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत पावसाळी पाण्याचे नियोजन करणे आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.

हेही वाचा : इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

बैठकीत पूरव्यवस्थापन, मिरज एमआयडीसी मधील अंतर्गत रस्ते, रांजणी ड्राय पोर्ट, महापालिका ई बस चार्जिंग स्टेशन, शेतीला दिवसा वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग, उपसा सिंचन योजना जलवाहिनीसाठी भूमिसंपादन, शिराळा नगरपंचायतीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची इमारत वापरण्याची परवानगी, कासेगाव पोलीस ठाण्याची इमारत, विनाअनुदानित शाळांना व्यायाम साहित्य पुरवठा, महानगरपालिका इमारत, नाट्यगृह आदिंबाबत उपस्थित आजी माजी लोकप्रतिनिधींनी मौलिक मत मांडले. प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते रोपट्यास जलअर्पण करण्यात आले. बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: We will cooperate for the development of sangli district deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 09:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • chandrakant patil
  • Sangli

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटील यांची घोषणा ! लवकरच ‘या’ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरु होणार एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती
1

चंद्रकांत पाटील यांची घोषणा ! लवकरच ‘या’ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरु होणार एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
2

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
3

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर
4

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.