पुणे : “लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना अलीकडच्या अर्थसंकल्पात पाहिल्या. पण गेले इतके वर्ष अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांना इतक्या वर्षात कधीच बहिण भाऊ आठवले नाही.’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांन अजित पवार यांना टोला लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य भरातील महिलांची गर्दी जमताना दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणारआहेत. पण या योजनेवरून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले, ‘ अर्थसंकल्पातील लाडकी बहिण योजना हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे. पण मला राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली दिसत नाही. राज्यावर कर्जाचा बोज वाढला आहे त्याचा विचार करायला हवा.
त्याचवेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य केले. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी भेट घेतली. त्यांची अलीकडची दोन तीन भाषणे चांगली वाटली. दोन-तीन विषयांवर ते बोलले. भुजबळांनी म्हणाले की, झाले गेले सोडून द्या, पण काहीतरी मार्ग काढायला हवा. शातंता निर्माण करण्यासठी तुमची गरज असल्याचं मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी केले आहे’, असेही ते म्हणाले.