बारामती: माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले.मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत? असा उपरोधिक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगाव कारखान्याला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.
शिरवली (ता.बारामती )येथे माळेगांव कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांकडून आमच्यावर खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत.कारखान्यावर कर्ज नाही, माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला हे सभासदांना माहीत आहे.
विरोधकांच्या कार्यकाळात साखर उत्पादन कमी झाले. इथेनॉल कमी भावात विकले.पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले याला जबाबदार कोण? असा सवाल करत माझ्यावर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे.सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते.
ज्या गावात जादा मतदान होईल त्या गावात स्विकृत संचालक,नोकर भरतीत प्राधान्य देऊ.सिंगल मतदान करु नका.कारखान्याच्या संचालकांना गाडी वापरता येणार नाही. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल.कारखान्याचा एक हि पैसा न घेता सीएसआर फंडातुन काम केले जाईल.
“अजित पवारला पैशाची गरज नाही, बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८५ वर्षांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना टोला लगावला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार बोलत होते.
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीनिमित्त कारखान्याच्या सदस्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझं पॅनेल निवडून दिलं, तर मी चेअरमन असेन. मग साखर आयुक्त काय करेल? सहकार मंत्री काय करेल?” असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत सभासदांना आपल्याच पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केलं.
Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; सर्व सात जणांचा मृत्यू
एकदा कारखान्याचा चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “डायरेक्टर चुकला तरी चिंता नाही, मी आहे ना. काय करायचं ते मी करेन,” असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला. अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आली होती. एक व्यक्ती त्रास देत असल्याचे तिने सांगितलं. मी तिला म्हणालो, बिनधास्त घरी जा, उद्या तो तुझी माफी मागेल. आणि खरंच, तसंच झालं,” अशी आठवण सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.