दोन वर्षांत माळेगाव कारखाना कर्जमुक्त करु, असे आश्वासन माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री तथा चेअरमन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रराव तावरे यांच्यासोबत जुळवून घेत काहीतरी मार्ग काढा, अशी मध्यस्थी केली होती, असे स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
आम्ही सहकारी साखर कारखाना कसा चालवतो हे विरोधकांना दाखवायचे आहे, असे सांगत भविष्यात कारखाना, शिवनगर प्रसारक मंडळातील शिक्षण, प्रयोगशाळेचा दर्जा, आयटीआयचे विस्तारीकरण, एआय तंत्रज्ञान यावर काम करणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगाव कारखान्याला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मी स्वतः होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच माळेगाव कारखाना पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवार यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार आपण स्वतः असल्याचे जाहीर केल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून, त्यांच्या घोषणाची स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना समर्थन दिले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नजीकच्या काळात होऊ घातली आहे. ही निवडणूक ' चौरंगी होणार की दुरंगी' याबाबत खुद्द सभासदांमध्येच संभ्रमावस्था आहे.
महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात माळेगाव कारखान्याचे नावलौकिक आहे.राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. बारामती तालुक्याच्या आजुबाजुला पवार घराण्यातील खासगी कारखाने आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात गाजणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय येळे यांनी तहसील कार्यालयात दाखल केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एकूण ८१ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल झाले आहेत.