फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महिलांनी भविष्यात सबल व्हाव,सुरक्षित रहाव या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली.अनेकांनी या योजनेवर टिका केली.दरमहा दीड हजार रूपयांनी बहिणींच काय होणार आहे.दिड हजाराची किंमत गरीबाला माहीत आहे.त्याची किंमत तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांना नाही समजणार अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवर्धन येथील र.ना.राऊत मैदानात झालेल्या जनसन्मान यात्रे दरम्यान केली.
यावेळेस व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे,मा.आमदार अनिकेत तटकरे,रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,कार्याध्यक्ष सुभाष केकाणे,जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे,श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोहंमद मेमन,अंकित साखरे,शादाब गयबी, हे मान्यवर उपस्थित होते.
महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवतोय तशीच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत योजना आणणार
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आदिती तटकरे व मी स्वतः या योजनेबाबत बसून चर्चा केली.या योजने बाबतीत आदितीचा पुढाकार होता.ही योजना यशस्वी झाली.काही ठिकाणी या योजनेत गैरव्यवहार झालेला दिसला.लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार भविष्यात आढळला तर चुकिला माफी नाही.संबंधित व्यक्तीवर कारवाई होणार.महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवतोय तशीच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत योजना आणतोय.महाराष्ट्रात अशी बावन्न लाख कुटुंबे आहेत ज्यांच्या खात्यात दरवर्षी तीन सिलेंडरचे पैसे जमा होतील.त्याचप्रमाणे गरीब मुलगी ती कुठल्याही जातीची असो तीचा महाविद्यालयीय खर्च शासन करेल.
विरोधकांनी अपप्रचार केला
खासदार सुनील तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,शासनाने बहीण माझी लाडकी योडना यशस्वी केली.विरोधकांनी अपप्रचार केला खात्यात पैसे जमा होणार नाहीत.योजना फसवी आहे.महाविकास आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेत ही योजना रद्द करावी आशी मागणी केली.पण ही योजना योग्य आहे असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.बहिणींच्या खात्यात एक कोटी सात लाख जमा झालेत याचा मला अभिमान आहे.
प्रास्ताविक भाषणात मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने २०१९ साली मला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या सर्वांमुळे मी आमदार झाल्ये.राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी काम करण्याची संधी आपण दिलीत.ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बॅरिस्टर ए.आर.अंतुले,मंत्री रवींद्र राऊत यांनी केल त्यात मतदारसंघाचे नेतृत्व मी आज करीत आहे.
श्रीवर्धनमधील पर्यटन वाढीसाठी शाश्वत पर्यटन धोरण
श्रीवर्धन तालुक्यात अनेक पेशवेकालीन व प्राचीन मंदिरे आहेत.अथांग समुद्र किनारा तालुक्याला लाभलाय.इथे सुधारणा केल्या जातील.पर्यटनातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता शासन प्रयत्नशील असेल.पर्यटन वाढीसाठी थीमपार्क,ॲडव्हेंचर स्पोर्ट्स,शाॅपींग माॅल,वाॅटर पार्क ही व्यवस्था असेल.भविष्यात श्रीवर्धन हरिहरेश्वर जो मार्ग अठरा किलोमीटरचा आहे तो पाच किलोमीटरचा व्हावा याकरीता काळींजे खाडीवर पुल उभारण्याचे नियोजन आहे.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतोवाच केले जेणेकरून पर्यटन वाढीस वाव मिळेल.
श्रीवर्धन तालुक्यातील दुर्बल घटक तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना र ना.राऊत महाविद्यालयाच्या आवारात सायकल वाटप करण्यात आले.एकूण तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप होत असून आज तीनशे ऐंशी सायकल उपमुख्यमंत्री,खासदार,आमदार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.