Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chakan News: बड्या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना वेग

अजित पवार यांचा वराळे येथील नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यातील जिजाई निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 09, 2026 | 02:13 PM
Chakan News: बड्या नेत्याने घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चांना वेग
Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट
  •  आगामी जिल्हा परिषद निवडणूक शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढवावी, अशी मागणी
  • शरद बुट्टे पाटील यांचे अजित पवार यांच्याशी १९९९ पासूनचे घनिष्ठ संबंध
अतिश मेटे, Chakan News: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी काल रा   राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे शरद बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला आहे.

ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीमागील नेमका उद्देश काय, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Ajit pawar News)

अजित पवार यांचा वराळे येथील नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर त्यांनी शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यातील जिजाई निवासस्थानी चर्चेसाठी बोलावून घेतले. या भेटीत भामा खोऱ्यातील रखडलेली रस्ते कामे, प्रमुख जिल्हा मार्गांचे रुंदीकरण, कुंडेश्वर घाट रस्त्याची सुधारणा, भामा–आसखेड प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागण्या मांडण्यात आल्या.

PMC Election 2026: चंद्रकांत पाटलांना आता प्रभाग ९ मध्ये दारोदारी फिरण्याची वेळ आली; अमोल बालवडकरांनी जखमेवर मीठ चोळलं

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “पालकमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून विकासकामांसाठी निधी देण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत. आवश्यक ते सहकार्य निश्चितपणे केले जाईल,” असे आश्वासनदिल्याची प्राथमिक माहिती आहे.. दरम्यान, शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लढवावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Zilla Parishad Election 2026) 

भामा खोऱ्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामांना निधी मिळाळा आणि आजही तो मिळतोय. पण स्थानिक आमदार विरोधी पक्षाचे असल्यामुळे निधी न मिळाल्याने महत्त्वाच्या  रस्त्यांची कामे रखडली आहे. ती मार्गी लावावीत, अशी मागणी बुट्टे पाटील यांनी अजित पवारांकडे केली. ” मी काम कऱणारा माणूस असून विकास कामांना निधी देण्याचा अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या बजेटमधून निधी देण्याचे काम लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी बुट्टे पाटील यांना दिले. दरम्यान, यावेळी बुट्टे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक शरद बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढवावी, अशी मागणीही केली. त्यामुळेदेखील या भेटीला एक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान

 शरद बुट्टे पाटील ११ वर्षांनंतर पुन्हा स्वगृही?

शरद बुट्टे पाटील यांचे अजित पवार यांच्याशी १९९९ पासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीची संधी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून २०१४ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपचे पदाधिकारी असतानाही विकासकामांमध्ये पवार यांचे सहकार्य कायम राहिले.

लोकसभा व विधानसभा प्रचारादरम्यान पवार यांनी सार्वजनिकपणे बुट्टे पाटील यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे नमूद केले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील व दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारातही बुट्टे पाटील सक्रिय होते. त्यामुळे त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दिलीप मोहिते पाटील यांनीही स्थानिक व काम करणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन करत अप्रत्यक्षपणे बुट्टे पाटील यांना मदतीचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Chakan news sharad butte patil meets ajit pawar talks of joining ncp accelerate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Chakan News
  • NCP Politics
  • Zilla Parishad Election

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास
1

Asaduddin Owaisi Solapur : हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान…; असदुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय
2

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय

‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान
3

‘अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका’; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ
4

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.