
AIMIM Asaduddin Owaisi Solapur sabha claimed hijab woman become PM Of India
सोलापुरात अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी आणि एमआयएम अशी थेट लढत होत आहे. यामुळे जोरदार टीका केली जात आहे. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि आताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तौफिक शेख यांच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. यावेळी औवेसी म्हणाले की, “सोलापूरला आपण पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथं इतक्या वर्षांपासून आहेत, काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलंय की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण हा दिवस एक ना एक दिवस नक्की येईल.”असा विश्वास असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार
अजित पवार आणि महायुतीवर टीका करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदीच्या गोदीत बसलेत. अजित पवारांना व्होट म्हणजे मोदींना व्होट. अजित पवारला व्होट म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काही घेणे-देणे नाही, पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही त्रिमूर्ती ही एकच आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील, त्यांना मटपेटीतून उत्तर द्यावा लागेलं.”असा देखील टोला औवेसी यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : “एकनाथ शिंदेजी तुम्ही थेट ‘AIMIM’ वासी…”; अंबादास दानवेंची सडकून टीका
पुढे औवेसी म्हणाले की, “या नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी तुम्हीच एमआयएमला संजिवनी दिली होती . आज एमआयएमला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती करण्यासाठी मी आलो आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार, शिंदेचे लोक या नई जिंदगी परिसराला बदनाम करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना सगळ्यांना सांगणं आहे, हा परिसर असदुद्दीन ओवैसीचा आवडता आहे, हा परिसर सोलापूरचे हृदय आहे. जर तुम्ही या परिसराबद्दल काही चुकीचं बोललात तर मी तुमच्या बापाबद्दल बोलायला सुरु करेन.” असा घणाघात असदुद्दीन ओवैसींनी केला आहे.