Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : शेतकरी कर्जमाफीवरून पालकमंत्र्यांचं मोठं विधान; ‘एकही शेतकरी वंचित राहणार नाही…’

राज्यात पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५ हजार २८ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 09, 2026 | 04:04 PM
शेतकरी कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचं मोठं विधान; 'एकही शेतकरी वंचित राहणार नाही...'

शेतकरी कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचं मोठं विधान; 'एकही शेतकरी वंचित राहणार नाही...'

Follow Us
Follow Us:

अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील १९ हजार ९१० शेतकऱ्यांना एकूण १६९ कोटी ३६ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार असून, एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली.

शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच ही यादी ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Jalgaon Shalarth ID Scam : आरोपींवर कठोर कारवाई करा, शालार्थ आयडी घोटाळा; आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व पात्र शेतकऱ्यांना केले आहे.

पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश

अमरावती विभागातील १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीचा १ हजार ३७२ कोटी १७ लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे. तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५ हजार २८ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.

बँकांनी तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पात्र लाभार्थ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकाच्या आधारे अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Web Title: Agriculture minister major statement regarding farm loan waivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:03 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Satara News: कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसीला साताऱ्यात वेग; ८० टक्के शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण
1

Satara News: कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसीला साताऱ्यात वेग; ८० टक्के शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.