Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीच्या घटनेनंतर अकोला स्त्री रुग्णालय ‘अलर्ट’वर; नवजात शिशूच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांची सावध भूमिका

अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील दुर्घटनेत तीन नवजात शिशूचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक पराग गवई यांनी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू कक्षाची पाहणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 01:49 PM
अमरावतीच्या घटनेनंतर अकोला स्त्री रुग्णालय 'अलर्ट'वर; नवजात शिशूच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांची सावध भूमिका

अमरावतीच्या घटनेनंतर अकोला स्त्री रुग्णालय 'अलर्ट'वर; नवजात शिशूच्या सुविधांसाठी अधिकाऱ्यांची सावध भूमिका

Follow Us
Follow Us:

अकोला : अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी विविध ठिकाणांहून येणाऱ्या मातांसह नवजात शिशुंच्या सुरक्षिततेस्राठी प्रशासनाने खबरदारीची भूमिका घेतली आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रुग्णालय प्रशासन सतर्क एसएनसीयू कक्षातील सुरक्षाव्यवस्थेची नियमित तपासणी केली जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील डफरीन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत तीन नवजात शिशूचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर महिन्याला फायर आणि इलेट्रिकल ऑडिट केले जाते. तसेच आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी रुग्णालयातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून घेतले जाते, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव पवार यांनी दिली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील दुर्घटनेत तीन नवजात शिशूचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक पराग गवई यांनी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू कक्षाची पाहणी केली. सुविधांबाबत समाधान व्यक्त करत, कर्मचारी कमतरता दूर करण्यासाठी शासनाने तत्काळ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

तीन एक्झिट, एक प्रस्तावित

एसएनसीयू कक्षात आग लागल्यास तत्काळ अलर्ट देणारी यंत्रणा कार्यरत आहे. कक्षात सध्या तीन एक्झिट दरवाजे असून, आणखी एका दरवाजाचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण व शिशुंना सुरक्षितपणे चाहेर काढण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षण बंधनकारक

आग प्रतिबंध नियंत्रणासाठी दर महिन्याला कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण आयोजित केले जाते, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग बंधनकारक असून, त्यांच्याकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महिला कर्मचारीही तातडीने मदतीसाठी पुढे येऊ शकणार आहेत.

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट

अमरावती येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांमधील सुरक्षा यंत्रणा आणि विद्युत साहित्याची मंगळवारी (दि.२५) तपासणी करण्यात आली.

कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

Web Title: Akola women hospital on alert following the amravati incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.