अकोल्यातील तेल्हारा येथे एका तलाठ्याने गळफास घेत आत्महत्या केली. व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत त्यांनी आत्महत्या केली. या स्टेटसमुळे आत्महत्येचे कारण समजले असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
घरोघरी नळ असले तरी पाण्याच्या टाकीत चढणारे पाणी हे गावातील विहिरी आणि बोअरवेलमधीलच आहे. येथे पूर्णतः क्षारयुक्त पाणी असल्याने अनेकांना विविध आजाराला सामोरे जावे लागते आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेडवाल (वय 22) याने छत्रपती संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
माघी गणेशोत्सवामधील विसर्जनावरुन राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. पीओपीच्या मुर्ती विसर्जन करु देत नसल्यामुळे राजकारण तापले आहे. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे
करंजी येथील रहिवासी विवाहित महिला शौचाला जात असताना करंजी गावातच राहणारा आरोपी ज्ञानेश्वर लहाने याने पीडित महिलेचा पाठलाग गेला. त्यानंतर त्याने त्या महिलेचा विनयभंग केला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी कर्जमाफी यावर मत मांडले आहे. त्यांनी जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, गाडगेनगर हद्दीतील गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून एलजी कंपनीचे कॉम्पुटर मॉनिटर, वायफाय राऊटर, बिलींग मशीन प्रिंटर व कॉम्पुटर असा एकूण 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकसभेत आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. आता महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेना ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार आहेत.
सविता ताथोड असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी धीरज चुंगडे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. ही हत्या गंभीर असून, महिलेच्या हत्येने चांगलीच खळबळ उडाली आहे. सविता ताथोड यांच्यावर चाकूने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
गॅस टँकरचा अपघात झाल्यावर सुदैवाने त्यातून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जयपूर येथील गॅस टँकरच्या भीषण अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.