Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौण खनिज महसूल वसुलीला ‘ब्रेक’; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

मागील वर्षी गौण खनिज विभागाला १३० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १०१ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा २८ कोटी ३६ लाख रुपयांची तूट निर्माण झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 01:50 PM
गौण खनिज महसूल वसुलीला 'ब्रेक'; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

गौण खनिज महसूल वसुलीला 'ब्रेक'; 8 महिन्यांत 89 कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे विभागासमोर आव्हान

Follow Us
Follow Us:

अकोला : अकोला जिल्ह्यात गौण खनिज विभागामार्फत होणाऱ्या महसूल वसुलीची गती मंदावली असून, जिल्हा प्रशासनासमोर उर्वरित आठ महिन्यांत ८९ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मागील आर्थिक वर्षातही खाणकाम विभागाला निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करता आले नव्हते.

मागील वर्षी गौण खनिज विभागाला १३० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात १०१ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा २८ कोटी ३६ लाख रुपयांची तूट निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने चालू आर्थिक वर्षासाठी अकोला जिल्ह्याचे महसूल उद्दिष्ट कमी करून ११० कोटी रुपये निश्चित केले आहे. मात्र, तरीही वसुलीच्या गतीत अपेक्षित वाढ झालेली नाही.

ST Employees Salary : एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा लांबणीवर; ‘कर्मचाऱ्यांचे संसार वेठीस धरू नका’, ७ तारखेचा पगार आता १० ऑगस्टला?

आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यांत केवळ २० कोटी ५८ लाख रुपये म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या १८.७२ टक्के महसूल जमा झाला आहे. आता उर्वरित आठ महिन्यांत ८९ कोटी ४२ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. रॉयल्टी तसेच मागील थकबाकी वसुलीत अकोला तालुक्याने आघाडी घेतली असून, आतापर्यंत ७ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. ही कामगिरी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची माहिती प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केली आहे.

अवैध उत्खननावरील कारवाईवर भर

गौण खनिज महसूल वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट व खडी खाणींचे लिलाव, तसेच अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कारवाई केली जाते. नवीन आर्थिक वर्षात रेतीघाटांच्या लिलावप्रक्रियेला वेग दिला जाणार असून, पावसाळ्यानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; उमा प्रकल्पामध्ये केवळ 4 टक्के जलसाठा

Web Title: Minor mineral revenue collection halted in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • akola news
  • Revenue Department

संबंधित बातम्या

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान
1

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
2

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
3

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
4

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.