Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यातील ‘काटेपूर्णा’त 25 टक्केच जलसाठा; मोठ्या जलसंकटाची शक्यता

अपुऱ्या पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी खालावली असून, सध्या या प्रकल्पात केवळ २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2026 | 03:39 PM
अकोल्यातील 'काटेपूर्णा'त 25 टक्केच जलसाठा; मोठ्या जलसंकटाची शक्यता

अकोल्यातील 'काटेपूर्णा'त 25 टक्केच जलसाठा; मोठ्या जलसंकटाची शक्यता

Follow Us
Follow Us:

अकोला : ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने अकोला जिल्ह्यावर मोठे जलसंकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी खालावली असून, सध्या या प्रकल्पात केवळ २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली आहे. इतर प्रकल्पांमध्ये संमिश्र जलसाठा असला, तरी अकोला शहराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील कमी साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच आगामी चार दिवसांत जिल्ह्यात दमदार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोलावासियांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेल्याने आता सप्टेंबर महिन्यात तरी दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा अकोलावासियांकडून व्यक्त होत आहे.

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाल्यास काटेपूर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते. बुधवारी सकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आलेल्या जलसाठा अहवालानुसार, काटेपूर्णा प्रकल्पाची जलपातळी ३४१.५५ मीटर असून, प्रकल्पात २१.५११ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २४.९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी काटेपूर्णा प्रकल्पात तब्बल ८९.७३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्‌यात झालेली प्रचंड घट चिंताजनक आणि गंभीर बाब मानली जात आहे.

उपाययोजना करण्याची गरज

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे उपडीप दिल्याने घरणामध्ये नवीन पाण्याची आवक जवळपास थांबली आहे. परिणामी, प्रकल्पामधील जलसाठधात अपेक्षित वाढ झालेली नाही. उपलब्ध पाणीसाठा पुढील काळासाठी कसा नियोजित करायचा, तसेच पाणीपुरवठ्याचे संकट टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायाय, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

‘सातारा जिल्ह्याला खासदार, आमदार, मंत्री अशा विविध पातळ्यांवर राजकीय ताकद लाभली, मात्र…’; काँग्रेसचे सादिकअली बागवान यांची टीका

Web Title: Only 25 water storage in akolas katepurna reservoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.