
रेल्वेसाठी अकोलेकर आक्रमक; संगमनेरचे आमदारही सहभागी
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे संगमनेर–अकोले मार्गे जावी, देवठाण येथे थांबा मिळावा, तसेच शिर्डी–अकोले–शहापूर हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करावा, या मागण्यांसाठी अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने आज संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
भिवंडीत संवर्धनाचा अभाव; कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र देखरेख नाही; नागरिकांमध्ये संताप
“पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर–अकोले मार्गे गेलीच पाहिजे”, “शिर्डी–अकोले–शहापूर रेल्वे मार्ग झालाच पाहिजे”, “रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची”, “रेल्वे नाही तर पाणी नाही” अशा जोरदार घोषणांनी प्रांताधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
अकोले तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने सकाळी अकोले येथून निघालेला मोर्चा दुपारी संगमनेरमध्ये दाखल झाला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार किरण लहामटे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, वसंतराव मनकर, अशोक देशमुख, विजय वाकचौरे, विनय सावंत, अमित भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, बाजीराव दराडे, दत्ता नवले, महेश नवले, अक्षय आभाळे, डॉ. संदीप कडलग, प्रदीप हासे, मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे, सुरेश गडाख आदींनी केले.
यावेळी समितीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन प्रांताधिकारी अरुण ठंडे यांनी स्वीकारले. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह संगमनेरमधील अनेक नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
‘ये पॉलिटिक्स है बाबू भैया’! Manikrao Kokate संकटात अन् मुंडे कमबॅक करणार? थेट मंत्री होऊनच…
यापुढे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे संगमनेर व अकोले या दोन तालुक्यांतूनच नेण्यात यावी. सिन्नरहून आल्यानंतर देवठाण येथे थांबा देऊन पुढे संगमनेरकडे मार्ग वळवावा, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
तसेच हा रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे नेण्यामागे नेमकी कोणाची भूमिका आहे, याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली. “मोठा भाऊ–लहान भाऊ अशा शब्दांत आता आम्हाला फसवू नका. तुम्ही आमच्यासोबत आला तर ठीक, अन्यथा तुमच्याशिवायही आम्ही पुढे जाणार,” असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.