Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 200 लिटर लिक्विडमधून तब्बल 2500 लिटर भेसळयुक्त दूध

अवघ्या २०० लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल २ ते अडीच हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 09:35 AM
मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे सुरू असलेल्या दूध भेसळीच्या जीवघेण्या उद्योगावर अन्न व औषध प्रशासन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या धाड टाकत भेसळीचा भांडाफोड केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निर्दयपणे खेळणाऱ्या या टोळीचा काळाकुट्ट कारभार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल २०० लिटर क्षमतेचे ६ ड्रम असा एकूण १२०० लिटर फॅट वाढविणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली.

अवघ्या २०० लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल २ ते अडीच हजार लिटर भेसळयुक्त दूध तयार केले जाऊ शकते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या दुधातील फॅट कृत्रिमरित्या फुगवण्यासाठी पॅराफिन ऑईल आणि कृत्रिम फ्लेवरयुक्त द्रव तसेच विशिष्ट रासायनिक पावडरचा वापर केला जात होता. घटनास्थळीच अधिकाऱ्यांनी डेमो सादर करून या भेसळीची पद्धत उघडकीस आणली. या रसायनांचा मानवी शरीरावर गंभीर व दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेदेखील वाचा : Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे. भेसळ प्रकरणात दूध व्यवसायिक रामदास उबाळे याच्यासह समीर शेख आणि आफताब शेख यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामखेडमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे दूध व्यवसायातील भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या काळ्या साम्राज्याची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा सखोल तपास आता सुरू झाला आहे. याप्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे.

हेदेखील वाचा : Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

भेसळयुक्त दुधामुळे आग्र्यात दोघांचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भेसळयुक्त दूध प्यायल्याने दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता. FSSAI टीमने आग्रा-बाह रस्त्यावर एक टँकर पकडला, ज्यामध्ये 5000 लिटर भेसळयुक्त दूध भरलेले होते. हे दूध रस्त्यावर ओतून लगेच नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत सुमारे 1.25 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Milk adulteration gang busted in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Ahilyanagar
  • milk

संबंधित बातम्या

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर
1

Gandhi Jayanti In Shevgaon : शेगावात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; ‘नमो सेवा गाथा’तून शासकीय योजनांचा जागर

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ
2

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
4

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.