Preparations for the stay of the Warkaris at Kadamwakvasti for the palanquin of Sant Tukaram Maharaj
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात.
दिनक्रम कसा असेल?
पहाटे 4 वाजता – घंटानाद
पहाटे 4:15 वाजता – काकड आरती
पहाटे 4 :15 ते 5: 30 वाजता – पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती
सकाळी 5 ते 9 वाजता – श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा
सकाळी 6 ते 12 वाजता – भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, किर्तन, विणामंडप
दुपारी 12 ते 12:30 वाजता – गाभारा स्वच्छता, समाधीवर पाणी घालणे आणि महानैवेद्य
दुपारी 12:1 वाजता – भाविकांना समाधीचं दर्शन
सायंकाळी 4 वाजता – पालखीचं प्रस्थान होईल
एकनाथ महाराजांची पालखी निघाली
मानाच्या दहा पालख्यांपैकी एक असलेली एकनाथ महाराजांची पालखी पैठण समाधी मंदिरातून निघाली. गोदावरी काठी पोहोचलेल्या या पालखीनं इथेच पहिला विसावा घेतला आहे. तिथून ही पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे.. मोठ्या संख्येनं वारकरी यात सहभागी झालेत.. 425 वर्षांचा इतिहास असलेली ही पालखी तब्बल 19 दिवसांचा प्रवास करून पंढरीत पोहोचेल.
नाशिकच्या दोन भाविकांनी पंढरपूरच्या विठुरायाला चांदीचा मुकूट अर्पण केलाय. मुकुटावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलंय. हा मुकूट दीड किलो वजनाचा असून, या मुकुटाची किंमत 93 हजार इतकी आहे.