Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पुणे पोलीस आयुक्त व गृहमंत्री खोटं बोलत आहेत, अपघात प्रकरणात 304 कलम नाहीच’; FIR दाखवत अंबादास दानवेंचा आरोप

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये गृहमंत्री व पुणे पोलीस आयुक्त खोटं बोलत असल्याचे देखील दानवे म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: May 22, 2024 | 03:29 PM
‘पुणे पोलीस आयुक्त व गृहमंत्री खोटं बोलत आहेत, अपघात प्रकरणात 304 कलम नाहीच’; FIR दाखवत अंबादास दानवेंचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईमध्ये लोकसभा निवडणूकीचे मतदान पार पडले आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्य मुख्य सचिवांच्या दोन बोटांवर मतदानाची शाई लावण्यात आली असल्याचा आरोप दानवे यांनी केला. त्याचबरोबर  पुण्यातील कल्याणीनगर परिसरामधील अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणामध्ये कलम चुकीचे लावल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

मुंबईच्या मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले, “मतदान केंद्रावर अनागोंदी माजली होती. यावेळी सरकार आणि निवडणूक आयोगाची निष्काळजी दिसून आली. या सगळ्या प्रकरणाच्या खोलवर गेलो तर यामध्ये मोठ षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर निवडणूकीच्या पूर्वीच राज्याचे निवडणूक आयुक्तांची बदली केल्यामुळे आयुक्त आपल्या मर्जीचा किंवा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा हवा होता का,” असा गंभीर सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

भाजपकडून कोट्यवधी रुपयांचे वाटप

त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून खास करुन भाजपकडून पैसे वाटप करण्यात आले. भांडुपमधील भाजपच्या कार्यालयातून उघड उघड कोट्यवधी रुपयांचे वाटप चालू होते. तिथे राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते. आपलं कामकाज सोडून त्यांनी भांडुपला भेट दिली होती, याचाच अर्थ काळबेरं होत अशा घटना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला

राज्याच्या मुख्य सचिवाच्या दोन बोटांवर शाई

राज्याच्या मुख्य सचिवाच्या हातावरील दोन बोटांवर शाई लावण्यात आली आहे असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे म्हणाले, “तुम्हाला आश्चर्य वाटेल पण राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या बोटावर दोन ठिकाणी शाई आहे. खरंतर शाई ही डाव्य़ा हाताच्या तर्जनीवर लावली जाते. मात्र त्यांच्या तर्जनी आणि मधल्या बोटावर सुद्धा शाई लावण्यात आलेली आहे. त्यांनी मलबार या भागामध्ये मतदान केले आहे. त्यांच्या दोन्ही बोटांवर शाई आहे. राज्याच्या मुख्य सचिवाच्या हातावर निवडणूक अधिकारी शाई लावतात याच्यावर ते सामान्य माणसांबाबत काय करु शकतात याचा अंदाज आपण लावावा,” अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे.

पुणे अपघात प्रकरणात 304 कलम लावलेलं नाही

पुण्यातील अपघात प्रकरणावर देखील अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. दानवे म्हणाले, “गृहमंत्री सांगत आहेत त्यांनी 304 कलम लावलं आहे. पण माझ्याकडे एफआयआरची प्रत आहे. त्यांनी 304 (अ) हे कलम लावलं आहे. पुणे पोलीस आयुक्त व गृहमंत्री पत्रकार परिषदेमध्ये 304 कलम लावण्याचं सांगत आहेत. मात्र ते दोघं खोटं वक्तव्य करत आहेत. दोन्ही कलमांना वेगळ्या शिक्षांची तरतुद आहे. त्यामुळे मुद्दामून 304 (अ) लावलं का याची चौकशी झाली पाहिजे,” असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी मांडले आहे.

Web Title: Ambadas danve clamis pune police commissioner and home minister are lying there is no section 304 in pune accident cases nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • DCM Devendra Fadnavis
  • Loksabha Elections
  • political news

संबंधित बातम्या

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
1

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
2

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
3

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
4

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.