'मराठी'ने घडवली राज्याच्या भविष्याची गळाभेट; अमित अन् आदित्यची जोडी करणार कमाल? वाचा सविस्तर...
मुंबई: आज मुंबईच्या वरळी येथे ठाकरे बंधू यांचा मराठी विजय मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. कोणत्याही स्थितीमध्ये राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू देणार नाही असा इशारा ठाकरे बंधू यांनी दिला आहे. मात्र या मेळाव्यात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
आज वरळी येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. मेळावा संपल्यावर ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे फोटोसेशन देखील केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यावर सर्व नेतेमंडळी व्यापीठावर उपस्थित होते. त्यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरे यांची.
आदित्य आणि अमित ठाकरे यांनी एकमेकांची गळाभेट घतली. त्यांतर राज्याच्या राजकारणात त्यांच्या गळाभेटीची चर्चा सुरू झाली आहे. दोन युवा नेत्यांची गळाभेट ही महाराष्ट्राच्या राजकारणातली नवीन नांदी तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. मेळावा संपल्यावर जेव्हा सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते तेव्हा अमित ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या शेजारी तर आदित्य ठाकरे हे राज ठाकरेंच्या बाजूला उभे होते.
आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्रित मिळून महराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय लिहिणार हे पहावे लागणार आहे. तसेच हे आपापल्या पक्षांना कशा पद्धतीने पुढे घेऊन जातात हे पहावे लागणार आहे.
राज ठाकरेंचा घणाघात
आमची भाषणे संपली की एकत्रितपणे आरोळ्या ठोका. खरेतर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूने कसा एकवटतो ते मोठ्या प्रमाणावर दिसून आले. पण केवळ मोर्च्याच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. खरतर आजचा मेळावा शिवतीर्थावर होयला हवा होता. मात्र पावसामुळे ते शक्य नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणाशिवाय महाराष्ट्र मोठा आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “आज जवळपास 20 वर्षांनी मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्हा दोघांना एकत्र आणायचे जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही. जे अनेकांना जमले नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.”हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं.
Raj Thackeray Live: “आम्हाला एकत्र आणणे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना…”; राज ठाकरेंचा घणाघात
तसेच “आता सर्वच चॅनेलचे कॅमेरे इकडे लागले तिकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. काय वाटतं काय,. दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती. कोणी कमी हसलं का. बोलतायत का. आपल्याकडे इतर विषय सोडून इतर गोष्टीत रस असतो अनेकांना. आजचा हा मेळावा. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही कुणी,” असं राज ठाकरे म्हणाले. आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये…