Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून ‘या’ नावाची चर्चा सुरु

ठाकरे गटाची साथ घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे समजते. विधानसभेतील संख्याबळानुसार, महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 27, 2026 | 09:48 AM
काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून 'या' नावाची चर्चा सुरु

काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून 'या' नावाची चर्चा सुरु

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या आहेत. यातील एका जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून शरद पवार यांचे नाव राष्ट्रवादीकडून पुढे केले जात आहे. मात्र, आता या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने कोणत्याही स्थितीत एक जागा मिळवण्यावर भर दिला आहे. त्यानुसार, काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव समोर आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाची साथ घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्याचा नवा फॉर्म्युला तयार केला जात असल्याचे समजते. विधानसभेतील संख्याबळानुसार, महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दहा असे संख्याबळ आहे. भाजपकडून सहा जागांसाठी प्रयत्न होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातव्या जागेसाठी करिश्मा केला जातो का? याकडेही लक्ष लागले आहे.

दरम्यान, महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांचा गट अजित पवार गटात विलीन करण्याचे वारे वाहू लागले होते. मात्र, आता त्यास ब्रेक लागले आहेत. ही स्थिती असली तरी, शरद पवार यांच्या ऐवजी काँग्रेसने उमेदवार देण्यावर भर दिल्याचे समजते. यास ठाकरे गटाकडूनही बऱ्यापैकी समर्थन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवार गटाला बाहेर ठेवून नवा उमेदवार देण्याचे प्रयत्न चालले आहेत.

शरद पवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यास…

शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेत पक्षाच्या इतराला संधी दिल्यास अडचण होण्याची शक्यता आहे. अशावेळी खबरदारी म्हणून काँग्रेसने दिल्लीत बळ वाढवण्याचे मनसुबे आखले आहेत. यासाठी ठाकरे सेनेसोबत अन्य एका उमेदवाराची मदत घेण्यात येणार आहे.

विधान परिषद की विरोधी पक्षनेते…

काँग्रेस-शिवसेनेच्या फॉर्म्युल्यानुसार अनुक्रमे राज्यसभा व विधान परिषद असा समझोता होण्याचे संकेत आहेत. मात्र, यात उभय सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे समजते.

भाजपकडून इच्छुकांचेही प्रयत्न

भाजपकडून इच्छुकांची यादी दिल्लीला गेली आहे. यानंतरही संधी मिळावी यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अशोक नेते आणि नवनीत राणा यांचे जोरदार प्रयत्न चालले आहेत. गेल्यावेळी अमरावती विभागातून डॉ. अनिल बोंडे यांना संधी दिल्याने आता पूर्व विदर्भातील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेदेखील वाचा : शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

Web Title: Congress fields balasaheb thorats name for rajya sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news
  • Rajya Sabha Election

संबंधित बातम्या

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
1

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
2

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
3

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
4

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.