shivsena leader sushma andhare target mahayuti over political leader case
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर जाऊन अभिवादन करताना केलेल्या भाषणातील एका विधानावरून मोठा राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. अमित शाहांनी मुघल बादशहा औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीचा उल्लेख ‘समाधी’ असा उल्लेख केला. त्यांच्याा या वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करत गृहमंत्र्यांना फैलावर घेतले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “रायगडासारख्या पवित्र भूमीवर उभं राहून औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कबरीला ‘समाधी’ म्हणणं हे केवळ भाषेतील चूक नाही, तर हे शिवप्रेमींच्या आणि स्वराज्याच्या विचारांवर आघात करणारे आहे. समाधी हा शब्द थोर संत, महापुरुष, देशासाठी बलिदान देणाऱ्यांसाठी वापरला जातो, औरंगजेबसारख्या आक्रमकासाठी नव्हे.”
Big Breaking: सुरक्षा दलांनी जंगलाला वेढा घातला अन्…; छत्तीसगडमध्ये २ नक्षलवाद्यांना ठोकण्यात यश
अमित शहांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माता जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी त्या संस्कारांवर हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष उभा केला. संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी-संताजी यांनी औरंगजेबाशी शेवटपर्यंत लढा दिला आणि अखेर महाराष्ट्रात त्याचीच ‘समाधी’ बनली. हे शिवचरित्र भारतातील प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे.”
या विधानातील ‘समाधी’ या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून शहांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे. सुषमा अंधारे यांचे मत आहे की, स्वराज्य आणि हिंदवी विचारांवर आघात करणारे असे विधान एका केंद्रीय गृहमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हते. या वादामुळे पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा वारसा आणि त्याच्या सन्मानाच्या राजकीय बाजूंवर चर्चा सुरू झाली आहे.
अमित शांहाच्या या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी एका ट्विटद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा. समाधी साधूसंत पुण्यवंताची असते. ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो. छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आले नाहीत!
विमानाने फिरायचा अन् इमारतीवर Spiderman सारखा चढून चोरी करायचा, १२ तासात पोलिसांकडून अटक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहून महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी भावनिक शब्दांत शिवचरित्राचा गौरव करत, रायगडाच्या ऐतिहासिक महत्त्वावर भर दिला.
“मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही, तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे,” असे सांगत शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “आमचे सरकार रायगडाला केवळ पर्यटनस्थळ बनवणार नाही, तर प्रेरणास्थळ बनवेल.”शिवाजी महाराजांची महानता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवण्याचा संदेश देताना शाह म्हणाले, “मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की, महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते पाहू नका. देश आणि जग त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई शिवाजी महाराजांनीच लढली होती.”
अमित शहा यांनी रायगडाच्या ऐतिहासिक संघर्षाचाही उल्लेख केला. “रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण स्वराज्य ही शिवाजी महाराजांची संकल्पना होती. त्यांनी २०० वर्षांपासून सुरू असलेली मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्याची खरी प्रेरणा महाराजांकडूनच मिळाली.”भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे सांगताना शहा म्हणाले, “जेव्हा स्वातंत्र्याच्या १०० वर्षांचा टप्पा येईल, तेव्हा भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.”