Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah News: शिवरायांसारखं साहस मी एकातही पाहिल नाही…; रायगडावरून अमित शाहांनी व्यक्त केल्या भावना

छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथीनिमित्त अमित शाहांनी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 12, 2025 | 02:02 PM
Amit Shah News: शिवरायांसारखं साहस मी एकातही पाहिल नाही…; रायगडावरून अमित शाहांनी व्यक्त केल्या भावना
Follow Us
Close
Follow Us:

रायगड:  अखंड महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊंना मी नमन करतो. जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर त्यांना स्वराज्याचा विचारही दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. ज्या ठिकाणी शिवरायांच्या सुवर्ण सिंहासन होतं त्याठिकाणी आज मी शिवरायांना अभिवादन केलं. त्यांना अभिवादन करताना माझ्या मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. शिवरायांनी स्वराज्य आणि स्वधर्मासाठी स्वत:च आयुष्य खर्च केलं”अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते किल्ले रायगडावर बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३४५ वी पुण्यतिथीनिमित्त अमित शाहांनी रायगडाला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

यावेळी असलेले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, उदयनराजे, आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, ‘आदिलशाही, निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम आपल्या शिवाजी महाराजांनी केलं. त्यांच्यानंतर मराठ्यांनीही अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. ज्यावेळी लोक स्वधर्म आणि स्वराज्याबाबत  बोलणं गुन्हा समजू लागले होते. त्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजपर्यंत अनेक नायकांची चरित्रं वाचली. मात्र शिवरायांसारख साहस मी एकाहीमध्ये पाहिलं नाही.’

देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग

अमित शाह म्हणाले,  “मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही, तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे,” असे सांगत त्यांनी महाराजांच्या इतिहासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आमचे सरकार रायगडाला केवळ पर्यटनस्थळ बनवणार नाही, तर प्रेरणास्थळ बनवेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  शिवाजी महाराजांची महानता महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवू नका, असा संदेश देत शाह म्हणाले, “मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. देश आणि जग त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई शिवाजी महाराजांनीच लढली होती.”

 रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी हा किल्ला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण   स्वराजाची संकल्पना ही शिवाजी महाराजांची होती. महाराजांनी 200 वर्षांपासून सुरू असलेली मुघलांची गुलामगिरी संपवली. स्वातंत्र्याची प्रेरणाही त्यांचीच होती.   भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे,’ असा संकल्प अमित शाह यांनी केला.

Web Title: Amit shah expressed his feelings from raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
1

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
2

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.