Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amol Mitkari : सुरेश धसही होते वाल्मीक कराडच्या संपर्कात; मिटकरींच्या आरोपाने खळबळ

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 08, 2025 | 11:50 PM
“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

आमदार सुरेश धस यांचा सीडीआर काढण्याची आवश्यकता आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अकोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते. मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहे. बीडच्या अनेकांना मुंडे यांना बाजूला करायचे आहे. संतोष देशमुख हत्येच्या दोन दिवस अगोदरपर्यंत धस हे कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे धस यांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली. धस यांच्या विरोधातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढू, जानेवारी २००१ साली पथर्डी तालुक्यात एका गावात दरोडा पडला होता. त्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेसुद्धा समोर आणले जातील, असा इशारा देखील त्यांनी दिला.

खंडणी, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे धस यांच्यावर दाखल आहेत. दरोडा टाकणारी दारासिंग ऊर्फ मारुती भोसले गँगच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ, असे टी शर्ट होते. ही भोसले गँग कोणाचाही काटा काढू शकते, हा नेता कोण ते सगळ्यांना माहिती आहे, असे मिटकरी म्हणाले.

सुरेश धस यांनीच बीडमध्ये हुकूमत तयार केली. इतिहासात तेच ‘आका’ होते. मी त्यांच्यावर आरोप केले की, मला थेट हत्येच्या धमक्या येत आहे. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे आरोपांची मोठी यादी आहे. निवडणूक निकालानंतर पालकमंत्रिपद आपणास मिळेल, असे धस यांना वाटले होते, पण ते मिळत नसल्याने धनंजय मुंडे यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मिटकरी म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा आहे. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करीत नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली. आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांना राजकीय द्वेषातून लक्ष्य केले जात असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

Web Title: Amol mitkari serious allegation on suresh dhas on walmik karad santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • amol mitkari
  • Suresh Dhas
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
1

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.