Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप

Amravati Newsग्रामीण भागातील अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मुलभूत सुविधांची कमतरता दूर करावी, सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून द्यावा तसेच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह, वीज आणि गॅसची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2026 | 02:21 PM
ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप

ग्रामीणमध्ये अंगणवाड्यांची दुरवस्था! सोयी सुविधांची वाणवा; निकृष्ट आहार, दूषित पाण्यामुळे पालकांमध्ये संताप

Follow Us
Follow Us:

Amravati News: वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत तसेच गटग्रामपंचायतींच्या अंतर्गत सुरू असलेल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे. कुठे वीज नाही, तर कुठे गॅस कनेक्शनचा अभाव आहे. काही अंगणवाड्यांमध्ये शौचालय आणि स्नानगृहाचीही सुविधा उपलब्ध नसल्याने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने अंगणवाड्यांच्या कामकाजासाठी निश्चित वेळापत्रक ठरवून दिले असतानाही अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस निर्धारित वेळेत उपस्थित राहत नसल्याने काही अंगणवाड्या वेळेवर सुरू होत नाहीत. तर काही ठिकाणी अंगणवाड्या बंदच आढळून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच बालकांना पोषण आहारातून सकस आहार मिळावा, यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार पुरविला जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाचा उद्देश आणि प्रत्यक्ष लाभार्थी बालके यांच्यात मोठी तफावत निर्माण झाल्याचे चित्र आहे. काही अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची सुविधाच उपलब्ध नाही. त्यातच काही ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अंगणवाड्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने बालकांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या ब्लिचिंग पावडरचाही पुरेसा वापर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीतील बालकांना पोषण, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांतील बालके मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे.

प्रशासनाने पाहणी करण्याची मागणी

ग्रामीण भागातील अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मुलभूत सुविधांची कमतरता दूर करावी, सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून द्यावा तसेच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह, वीज आणि गॅसची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ग्रामीण भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी

अंगणवाडी सेविकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायतला समस्यांबाबत तक्रार केली आहे. परंतु आम्हाला सरपंच व सचिवांकडून सहकार्य मिळत नाही. साधना पांडे, पर्यवेक्षक, बेनोडा (शहीद) अंगणवाडीच्या समस्या पंचायत समितीच्या सभेत कृती आराखडा व बजेटमध्ये मांडण्यात येणार आहे, अशी माहिती – नयना इंगोले, महिला बालकल्याण प्रकल्प विभाग यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati news poor condition of anganwadis in rural areas lack of amenities parents outraged over substandard food contaminated water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Amaravati
  • amaravati news
  • Bad Quality Food

संबंधित बातम्या

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश
1

Amravati News: ग्राम अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिकवर! अमरावती जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतमध्ये प्रणाली बसविण्याचे आदेश

Amravati News: समितीचा अहवाल शासनाला सादर! ‘डफरीन’ आगप्रकरणी चौकशी पूर्ण; दोषारोपण कोणावर हे गुलदस्त्यातच
2

Amravati News: समितीचा अहवाल शासनाला सादर! ‘डफरीन’ आगप्रकरणी चौकशी पूर्ण; दोषारोपण कोणावर हे गुलदस्त्यातच

Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा
3

Amravati News: सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यात २३ टक्क्यांची घट! जलाशयात ५८ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५७.३३ टक्के जलसाठा

Food Safety Feature : आता लगेच होणार कारवाई! खराब जेवणाची तक्रार करणं झालं सोपं; Swiggy कडून 24×7 Helpline नंबर लाँच
4

Food Safety Feature : आता लगेच होणार कारवाई! खराब जेवणाची तक्रार करणं झालं सोपं; Swiggy कडून 24×7 Helpline नंबर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.