Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक ‘हब’! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, ‘हब अँड स्पोक’ मॉडेलमध्ये समावेश

राज्यात अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी 'हब अँड स्पोक मॉडेल' राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात अमरावतीचा समावेश करण्यात आला.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 02:40 PM
अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक 'हब'! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, 'हब अँड स्पोक' मॉडेलमध्ये समावेश

अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक 'हब'! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, 'हब अँड स्पोक' मॉडेलमध्ये समावेश

Follow Us
Follow Us:

राज्यात अवयवदान व प्रत्यारोपण चळवळीला गती देण्यासाठी ‘हब अँड स्पोक’ मॉडेल राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात अमरावतीचा प्रादेशिक हब म्हणून समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विदर्भातील रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून, स्थानिक आरोग्यसेवेला मोठी बळकटी मिळणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Amravati Scandal: “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”, अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप

राज्यात अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘हब अँड स्पोक मॉडेल’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात अमरावतीचा समावेश करण्यात आला. त्यामुळे येथील आरोग्यसेवेला मोठी बळकटी मिळणार आहे. मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये ७ एप्रिल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण दिशानिर्देश देण्यात आले. नव्या मॉडेलनुसार राज्यातील नाशिक, पुणे, ठाणे, मीरा-भाईंदर आणि मुंबई ( वाडिया) आणि अमरावती येथे प्रादेशिक ‘हब’ उभारण्यात येणार आहे. त्यांना संलग्न ‘स्पोक’ रुग्णालयांच्या माध्यमातून सुलभ आणि जलद होणार आहे. त्यामुळे विदर्भातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील संदर्भ सेवा रुग्णालयाने या क्षेत्रातील आपल्या कार्याचे सादरीकरण बैठकीत केले.

विशेषतः अवयवदानासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, समुपदेशन यंत्रणा आणि तांत्रिक सुविधा याबाबत माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्तरावर अवयवदान प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी स्वतंत्र समुपदेशन विभाग स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ब्रेन-डेड रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रभावी समुपदेशन करणे गरजेचे आहे. यासोबतच, तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती व प्रशिक्षण, नियमित कार्यशाळा, जनजागृती मेळावे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दर २ महिन्यांनी ब्रेन डेड प्रकरणांचा आढावा घेऊन केलेल्या कामगिरीचे मूल्यांकनावरही भर आहे.

Amravati जिल्ह्यात १५ महिन्यात ७०४ आगीच्या घटना, मार्च महिन्यात सर्वाधिक घटना; MIDC तील उपकेंद्र १० वर्षांपासून बंद

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया १ एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. आतापर्यंत येथे तब्बल ७० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारे नवजीवन आहे. अमरावतीत या चळवळीला अधिक लोकाभिमुख करून दात्यांची संख्या वाढविणे, हीच प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नव्या धोरणामुळे अमरावती जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे अद्यावत अवयवदान प्रत्यारोपण ओटी देखील तयार केली. त्यामुळे यांचा उपयोग जिल्ह्याला होईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Amravati regional hub for organ donation organ transplantation will get a new boost amravati news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • amravati
  • Organ Donation

संबंधित बातम्या

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
1

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण
2

Amravati News: ताडोबाच्या बफर गावात आता तारू उद्यान! सुरक्षित खेळाच्या जागेसह पर्यावरण शिक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.