स्ट्रॉबेरीच्या मळ्यात सफरचंदाची बाग; पाचगणीतील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश मधील बागा आठवतात. मात्र तुम्हीही सध्या महाराष्ट्राची मिनी काश्मीर असलेल्या पाचगणी येथील खिगर गावातील शेतीत चक्क स्ट्रॉबेरीच्या मळ्यात सफरचंदाची बाग पाहायला मिळत आहे.
पाचगणी : सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश मधील बागा आठवतात. मात्र तुम्हीही सध्या महाराष्ट्राची मिनी काश्मीर असलेल्या पाचगणी येथील खिगर गावातील शेतीत चक्क स्ट्रॉबेरीच्या मळ्यात सफरचंदाची बाग पाहायला मिळत आहे. उच्चशिक्षित असलेल्या अनिल दुधाने यांनी आपल्या घरासमोरच्या जागेत सफरचंदाच्या झाडांची लागवड केली आहे.
महाबळेश्वर, पाचगणी यांचं नाव घेतलं की आठवतात लाल चुटक स्ट्रॉबेरी परंतु सातारा जिल्ह्यातील पाचगणी खिगरमध्ये राहणारे प्रगतशील शेतकरी अनिल दुधाने यांनी स्ट्रॉबेरी बरोबरच सफरचंदाची बाग फुलवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसं पाहिलं तर सफरचंद हे जम्मू काश्मीर, हिमाचल या थंड प्रदेशातील मुख्य फळ आहे. मात्र महाबळेश्वर, पाचगणी येथे या फळाची लागवड करता येऊ शकते, असा विचार आजपर्यंत कोणी केला नव्हता परंतु युवा शेतकरी नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करत असतात त्याचप्रमाणे हे प्रयोग यशस्वी करून शेती समृद्ध करू लागले आहेत.
पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उंच डोंगररांगामुळे या भागात पाऊस आणि हिवाळ्यात चांगलाच गारवा असतो. अनिल दुधाने यांना ११ एकर शेती आहे या शेतीमध्ये स्ट्रॉबेरी या पिकाचे मोठी लागवड केली जाते त्याचबरोबर गुजबेरी, राजबेरी, ड्रॅगन फ्रुट, पॅशन फ्रुट, त्याच बरोबर भाजीपाला आणि रब्बी पिके ते घेत असतात.
पाचगणी या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडीचे वातावरण असते त्यामुळे तेथे स्ट्रॉबेरी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ४ महिन्यापेक्षा जास्त दिवस थंड वातावरण असल्यामुळे तेथे सफरचंदाचां प्रयोग करावा असे त्यांना वाटले आणि त्यांनी पारंपरिक स्ट्रॉबेरीच्या शेतीसोबतच शेतकऱ्यांनी सफरचंद लावायचं ठरवली होते. त्यानंतर अनिल दुधाने यांनी हिमाचल प्रदेशातून सफरचंदाच्या ४ प्रकाराची रोपे आणली. सोनेरी, रेड डिलिशियस, लाल आंबेरी मार्कोटेस्ट, हार्मोन ९९ या जातीची २० रोपाची लागवड त्यांनी केली होती. हार्मोन ९९ या जातीच्या झाडांना सफरचंद आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाचगणीत आता शेतकरी सफरचंदाची शेती करायला लागले आहेत.
भागातील शेतकऱ्यांनी लागवड करावी
भारतात सफरचंदाची शेती ही मुख्यत्वे जम्मू-काश्मीर, सिमला, हिमाचल प्रदेश, कुलू-मनाली अशा थंड हवेच्या ठिकाणी होते. परंतू महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणीही आता काश्मीरी सफरचंदांचे मळे पिकायला लागले आहेत. हवामानाचा विचार करुन सफरचंद लागवडीचा धाडसी प्रयोग केलेल्या या शेतकऱ्यांचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड करावी, असं देखील प्रगतशील शेतकरी अनिल दुधाने यांनी सांगितले.
Web Title: An apple orchard in a strawberry orchard a successful experiment of a farmer in panchgani nrdm