Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य मंत्रीमडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय! आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासनाकडून अनुदान

आज झालेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Jul 23, 2024 | 08:33 PM
राज्य मंत्रीमडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय! आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासनाकडून अनुदान
Follow Us
Follow Us:

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये  आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे ठरले. मत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे . हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.

आशा सेविका गटप्रवर्तकांची राज्यातील संख्या

सध्या राज्यात ७५ हजार ५७८ आशा स्वयंसेविका आणि ३६२२ गटप्रवर्तक कार्यरत असून त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

आशा सेविका

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत “आशा स्वयंसेविका योजना” राबविण्यात येत आहे. आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे. आशा सेविका ही गावातील स्थानिक रहिवासी असल्याने व तिला स्थानिक भाषा अवगत असल्याने गावाच्या आरोग्य विषयक अडचणी समजून घेण्यास व नेतृत्व करुन गावपातळीवरील समस्या सोडविण्याकरिता आशा स्वयंसेविकेकडून महत्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्यातील १५ आदिवासी जिल्हे व ३१ बिगर आदिवासी जिल्ह्यांत आशा स्वयंसेविका कार्य करते. आशासेविकांना शासन मानधन देते.

अंगणवाडी सेविका- प्रत्येक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका असते. ही अंगणवाडी सेविका ही स्वयंस्वेयक असते. अंगणवाडी सेविका ही स्थानिक समाजातून नेमली जाते.  अंगणवाडीसेविकेला शासनाकडून मानधन देण्यात येते.

 

Web Title: An important decision in the cabinet meeting grant from govt to asha sevika anganwadi sevika helpers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • asha sevika
  • maharashtra
  • Maharashtra Govt

संबंधित बातम्या

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील भूसंपादन वाद अंतिम टप्प्यात; ‘सेव्हन इलेव्हन’ला 24.24 कोटींची भरपाई
2

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील भूसंपादन वाद अंतिम टप्प्यात; ‘सेव्हन इलेव्हन’ला 24.24 कोटींची भरपाई

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी
4

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.