Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त, सावंतवाडीतील ‘तो’ VIDEO व्हायरल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

शासकीय बैठकीचे गांभीर्य पायदळी तुडवून बांधकाम विभागाचा एक जबाबदार अधिकारी चक्क आपल्या मोबाईलवर मटक्याचे आकडे पाहण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीतून उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 01:38 PM
अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त, सावंतवाडीतील 'तो' VIDEO व्हायरल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त, सावंतवाडीतील 'तो' VIDEO व्हायरल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Follow Us
Follow Us:

सावंतवाडी : जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना, शासकीय बैठकीचे गांभीर्य पायदळी तुडवून बांधकाम विभागाचा एक जबाबदार अधिकारी चक्क आपल्या मोबाईलवर मटक्याचे आकडे पाहण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीतून उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संबंधित अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

सावंतवाडी पंचायत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विकासकामे, पाणीप्रश्न आणि पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनावर सभागृहात चर्चा सुरू असताना, बांधकाम विभागाचे हे अधिकारी कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून मोबाईलमध्ये मटक्याचे आकडे तपासत होते. त्यांच्या बाजूला बसलेल्या काही सतर्क व्यक्तींनी हा प्रकार ओळखून आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

उपसभापतींचा आक्रमक पवित्रा

उपसभापती गौरव मुळीक यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या या अधिकाऱ्याची त्यांनी भर सभागृहात कानउघाडणी केली. नाव न घेता, ‘महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अशा प्रकारे मोबाईलचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही,’ अशी कडक तंबी मुळीक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

हे सुद्धा वाचा : वांद्र्यात तोडक कारवाईचा चौथा दिवस; 90% झोपड्या जमीनदोस्त, आज पोलीस हायअलर्टवर

जनतेतून संताप: कारवाई होणार का?

सर्वसामान्यांच्या करातून पगार घेणारे उच्चपदस्थ अधिकारी जर शासकीय कामाच्या वेळी जुगाराचे आकडे पाहणार असतील, तर जनतेच्या प्रश्नांचे काय? असा सवाल आता सावंतवाडीतील नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून, जिल्हा प्रशासन या ‘मटकाप्रेमी’ अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: An officer has behaved irresponsibly in the sawantwadi panchayat samiti meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sawantwadi

संबंधित बातम्या

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
1

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग
2

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
3

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
4

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.