Nashik Guardian Minister Dispute: महायुतीत नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आले आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या वाटाघाटीमुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलहाचे वातावरण आहे, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापले दावे करत होते. शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चाही सुरू होती, मात्र भाजपकडून गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या झेंडावंदनाचीजबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार असल्याने या पालकमंत्रिपदाच्या वाटाघाटीला विशेष महत्त्व आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना दिल्यानंतर दादा भुसे आणि छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ यांना गोंदियामध्ये ध्वजारोहणाची जबाबदारी दिली होती; मात्र त्यांनी ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे झेंडावंदन गिरीश महाजन करतील असा निर्णय घेतला. पण त्यानंतर पालकमंत्रिपदावरून महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नाशिकच्या झेंडावंदनावरून गिरीश महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Changes in the country in 78 years: ८८ रुपयात सोनं, २५ पैशांत बटाटे, ४० पैसे साखर..; ७८ वर्षांत किती
पालकमंत्रिपदाच्या वादावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, “झेंडावंदन मी करतोय, हळूहळू पुढे जाऊ. केले तरी अडचण नाही, केले नाही तरी अडचण. मला अडचणीचे प्रश्न विचारू नका. मी कधीही मागणी केली नाही आणि रस्त्यावर उतरलो नाही. मला ही परिस्थिती आवडत नाही, परंतु सर्व काही अतिशय व्यवस्थित चालले आहे. कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत आणि जोरात कामे होत आहेत. आम्ही कुठेही मागे नाही; निधीची तरतूदही झाली आहे. सुरक्षित कुंभ करायचा आहे आणि नवीन वर्षात कामे पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा आहे.”
“सगळ्या जिल्ह्यात पालकमंत्री झाले आहेत; फक्त दोन जिल्ह्यात काम बाकी आहे. वाद झाला तेव्हा मी होतो, नंतर दादा भुसे आले, पण आमच्यात वाद नाही. क्लेम असतो, पक्षश्रेष्ठी जे ठरवतील ते मला मान्य करायचे असते. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्यावर नाराजी नाही; त्यांचा चेहरा प्रसन्न आहे. शासनाच्या गोंदिया पत्रकातील बदलाबाबत मला माहिती नाही; थोडाफार बदल होतात पण कुणी नाराज नाही.”
MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट
बिऱ्हाड आंदोलनासंदर्भात प्रतिक्रीया देताना, “आंदोलकांच्या मागण्या अडचणीच्या आहेत. उद्या आमचे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. सर्व प्रश्न चर्चेतून सोडविले जातील. राज्यातील पालकमंत्रिपदावरील मतभेद आणि बिऱ्हाड आंदोलन प्रशासन आणि राजकीय पक्षांसमोर संतुलन राखण्याचे आव्हान ठरत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.