crime (फोटो सौजन्य: social media )
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूंच्या वेशात तीन भामटे आले आणि दीक्षा देण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रॉड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Dharashiv crime: धाराशिव हादरला! जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या
नेमकं काय घडलं?
१० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तीन जण साधूच्या वेशात पाटील पार्क परिसरात फिरत होते. त्यांनी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी महिलेला ‘दीक्षा’ घेण्याचा आग्रह करत, तिचा विश्वास संपादन केला.महिलेला ‘धार्मिक कृतीतून कल्याण होईल’, असे सांगत सुरुवातीला 500 रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर “एक किलो तूप आणा”, “चहा पाजा”, अशा मागण्या करत घरातील सदस्यांना गुंतवून ठेवले. दरम्यान, त्या तिघांनी महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधली व तिच्या मनावर प्रभाव टाकत भुरळ घातली.
२० हजार रुपये केले लंपास
त्या महिलेच्या घरात असलेला एकूण २० हजार रुपयांचा ऐवज त्यांनी हातोहात उचलला आणि घटनेनंतर क्षणातच पसार झाले. काही वेळानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. ही घटना गजबजलेल्या भागात भरदिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी
नागपूरमधून एक चोरीची घटना समोर आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून ३५ हजार रुपये चोरी केली. पोलिसांनी कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. प्रणय थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत. संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले ३५ हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत. संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले 35 हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला.
प्रणय हा एक अस्थायी कर्मचारी असून तो ड्युटी नसतांनाही कार्यालयात आला होता. रोहिणी वाडीभस्मे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी प्रणय थोरात याला अटक करण्यात आली आहे. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.