trimbkeshvar (फोटो सौजन्य : social media )
त्र्यंबकेश्वर: श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या संख्येने लोक देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. यामुळे मोठी गर्दी आपल्याला मंदिरांमध्ये पाहायला मिळते. अनेकदा वादावादीच्याही घटना घडतात. अनेकदा सुरक्षारक्षकांकडून भाविकाला मारहाण देखील करण्यात येते. आता त्र्यंबकेश्वरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
15, 16, 17 ऑगस्ट रोजी सलगच्या सुट्ट्यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. काल त्र्यंबकेश्वर मंदिरात दुपारी मुख्य प्रवेशद्वारासमोरील हा धक्कदायक प्रकार घडला. मंदिर संस्थानाने मुख्य दर्शन अचानक बंद केल्याने भावनिक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली होती. याचं रूपांतर वादात झाले आणि यातूनच मारहाणीचा प्रकार घडला आहे. या व्हिडिओमध्ये सुरक्षारक्षक भाविकाला मारहाण करतांना दिसत आहे.
पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार
पुण्यात गन्हेगारी वाढली असून, गुन्हेगारांच्या टोळ्या सतत धुडगूस घालत असल्याचे दिसून येत आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटनांनी पुणेकर नागरिकांमधिये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब राखपसरे यांची आरोपींशी भांडणे झाली होती. राखपसरे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. या कारणावरुन नितीन, निकेश, गणेश, ओंकार आणि साथीदार चिडले होते. आरोपींनी १३ ऑगस्ट राेजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर लोहगाव भागात हल्ला केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे अधिक तपास करत आहेत. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पुणे शहरात किरकोळ वादातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना वाढत आहेत. किरकोळ वादातून कात्रज भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती.