मुंबई : कर्जबाजारी असलेल्या उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणीत सातत्याने वाढच होत आहे. आता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या विरोधात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी ‘दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ (डीएएमआपीएल) च्या बाजूने दिलेला 8 हजार कोटी रुपयांची मध्यस्थता भरपाई (आर्बिट्रल अॅवार्ड) देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने बुधवारी रद्द केला.
या निर्णयाने अनिल अंबानी यांना धक्का बसला आहे. तर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) विरुद्धच्या आर्बिट्रल अॅवार्डला पेटंट बेकायदेशीरतेचा सामना करावा लागला, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने अंबानींच्या दिल्ली एअरपोर्ट मेटोला दिल्ली मेट्रो रेल्वेने यापूर्वी भरलेली सर्व रक्कम परत करण्याचे निर्देश दिले आहेत. डीएमआरसीने रिलायन्स इन्फ्रा कंपनीला 3300 कोटी रुपये दिले होते ते आता परत करावे लागणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये राखून ठेवला होता निकाल
DMRC रक्कम जमा केली केली आहे ती त्यांना परत करावी लागेल. जबरदस्तीच्या कारवाईचा भाग म्हणून याचिकाकर्त्याने भरलेली रक्कम परत करायला हवी, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता.