मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. हे सर्व सुरू असतानाच मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केल्याने राजकारण तापलं आहे. अशातच सचिन वाझेच्या आरोपांवर आता अनिल देशमुखांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत देवेद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे. ‘मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने दिलेला जबाब ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे. सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. खुद्द उच्च न्यायालयाने या माणसाच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. ही फडणवीसांची नवी चाल आहे. दोन हत्येच्या आरोपात वाझे जेलमध्ये आहे. अशा माणसाला पकडून भाजप माझ्यावर आरोप करायला लावते आहे, असा पलटवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडवीसांवर केले आहेत.
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी 100 कोटी वसूली प्रकरणात जे काही घडले, त्याचे सर्व पुरावे आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे. मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. त्यात जयंत पाटीलयांचंही नाव आहे, असा आरोप सचिन वाझेंनी केला आहे.
दरम्यान, 100 कोटी खंडणी प्रकरण, 2021 च्या अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे तुरुंगात आहे. पण अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथी होेण्याची शक्यता आहे.