मुंबई : माजी परिवहन मंत्री व शिवसेनेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट (sai resort) वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोरोनाकाळात येथे रिसॉर्ट बांधण्यास परवानगी कशी मिळाली, तसेच इथली जागा अनाधिकृ आहे. म्हणजे अनधिकृत जागेवर बांधकाम करण्यात आले आहे. तसेच येथे मनी लॉन्ड्रीगचा (Money laundering) पैसा येथे वापरण्यात आला असून, आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी (BJP Leader Kirit Somayya) केला आहे.
[read_also content=”आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन, आरोग्यदायी सेवेची यशस्वी चार वर्ष https://www.navarashtra.com/maharashtra/organizing-various-activities-under-ayushman-bharat-fortnight-328747.html”]
दरम्यान, याआधी रिसॉर्टची पाहणी सुद्धा सोमय्यांनी केली आहे, तसेच हे अनाधिकृत बांधकाम असून यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, दापोलीतील रिसॉर्टशी माझा संबंध नाही असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. तर दसऱ्याच्या शूभ महूर्तावर अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचा किरीट सोमय्यांचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी अनिल परब यांना शिक्षा सुद्धा होऊ शकते असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.