शेतकऱ्यांसाठी खुशखबर! CM देवेंद्र फडणवीसांनी बॅंकाना दिले महत्त्वाचे आदेश
मुंबई: “मंत्रिंमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.गेल्या वेळी प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशी आपण घोषणा केली होती. पण त्यातून अहिल्यानगर हा जिल्हा वगळण्यात आला होता. अहिल्यानगरमध्ये शासकीय महाविद्यालय नव्हते. गेल्या अडिच वर्षात तर आपण १० मेडिकल कॉलेज तयार केले. आता आजच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करत आहोत. याचं नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे असेल. “अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते चौंडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडवीस म्हणाले की, “अहिल्यानगरमध्ये खास मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय संस्था तयार केले जाणार आहे. महिला सक्षमी करणासाठा ‘आदिशक्ती अभियान’ राबवण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. राज्यातील महिलांबाबत, आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक समस्यांबाबत सामाजात त संवेदनशीलता आणि जागृती निर्माण कऱण्याचा आपला प्रयत्न असेल. याबरोबर या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि एनजीओला ‘आदिशक्ती पुरस्कर’ प्रदान कऱण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मागच्या काळात झालेल्या निर्णय़ानुसार, धनगर समाजातील विद्यार्थांना इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळेत प्रवेश द्यायचा असे ठरवण्यात आले होते. या योजनेला “यशवंत विद्यार्थी” योजना असे नाव देण्यात आले आहेत. या माध्यातून आता जवळपास १० हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत. धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, यांच्याकरता प्रत्येक विभागस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतीगृह योजना सुरू करत आहोत. गेल्यावेळी अशी एक वसतीग-ह योजना सुरू केली होती. त्यासाठी नाशिकमध्ये कामही सुरू केलं. पण मध्यंतरी ती योजना मागे पडली. पण ही योजना पुन्हा आम्ही लाँच करत आहोत. त्यात पुणे आणि नागपूमध्ये तात्काळ याचं काम सुरु केलं आहे. सर्वच विभाग स्तरावर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करत आहोत, असही फडणवीसांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परकीयांच्या आक्रमणामुळे जी श्रद्धास्थाने नष्ट करण्यात आली होती. ती श्रद्धास्थानांच पुनरूत्जीवन करण्याचं काम अहिल्यामातांनी केलं. म्हणून चौंडी येथे राज्य सरकारच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यातून विविध प्रकारची कामे होतील.
याशिवाय, “अष्टविनायक गणपती स्थळांचा जीर्णोद्धार १४७ कोटी रुपये. श्री क्षेत्र तुळजाभवनी मंदिर विकास आराखडा १८६५ कोटी, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदीर विकास आराखडा २५९ कोटी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी, श्री क्षेत्र महालतक्ष्मी विकास आराखडा १४४५ कोटी, श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा ८२९ कोटी अशा जवळपास ५५०३ कोटींच्या प्रकल्पाना मान्यता देण्यात आली आहे.जे कार्य देशात अहिल्यादेवींनी जे कार्य केलं, तेच कार्य त्यांच्या त्रीशताब्दीनिमित्ताने महाराष्ट्रात राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असही त्यांनी सांगितलं.