
Antyodaya Anna Yojana new rules each person will seven and a half kg grains
Maharashtra News: नांदेड : रेशन सरकारकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत असून, अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांच्या धान्य वितरणाच्च्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. या नव्या निर्णयानंतर काही कुटुंबांना अधिक धान्य मिळेल, तर काहींना सध्यापेक्षा कमी धान्य मिळणार आहे. सध्या अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब ३५ किलो धान्य दिले जाते. मात्र नव्या नियमांनुसार धान्याचे वितरण प्रति व्यक्ती या आधारावर होणार आहे. प्रत्येक सदस्याला ७.५ किलो धान्य देण्याची योजना सरकारने आखली असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.
कमी आणि जास्त धान्य
या बदलामुळे चार किंवा त्याहून कमी सदस्य असलेल्या कुटुंबांना सध्यापेक्षा कमी धान्य मिळेल, तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना अधिक धान्य मिळणार आहे. देशभरात सध्या १.७१ कोटी अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबे आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धान्याची बचत होणार
यापैकी बहुसंख्य कुटुंबांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असल्याने नव्या निर्णयामुळे सरकारला धान्याची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. सरकारचे म्हणणे आहे की या योजनेमुळे धान्याचे वितरण अधिक न्याय्य आणि गरजेनुसार होईल. सामान्य रेशन कार्डधारकाना ज्या प्रमाणे सध्या प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मिळते, त्यापेक्षा अंत्योदय योजनेतील लाभाध्यर्थ्यांना ७.५ किलों प्रति सदस्य या प्रमाणात अधिक धान्य मिळणार आहे. अंमलबजावणी झाल्यानंतर हा निर्णय गरीब व गरजू कुटुंबांना अधिक लाभदायक ठरेल की उलट अडचणी निर्माण करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शासकीय धान्याचा घोटाळा ?
केंद्र व राज्य शासनाने गरीब जनतेसाठी राबविलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैख्यवहार होत असल्याचा गंभौर आरोप आरटीआय कार्यकर्ता नदाफ बटेर खान यांनी केला आहे. या योजनांचा लाभ प्रत्यक्षात गरीब लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता, तहसील कार्यालय, गोदामात व काही परव्यना धारक दुकानदारांच्या संगनमताने राजरोस चोरी व तस्करी केली जात असल्याचे उपड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता नाफ बशीर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वसमत तहसील कार्यालयल शासकीय धान्य गोदामात पोत्यांवरील सील फोडून धान्याचा अपहार केला जातो. संबंधित अधिकारी व गोदामपाल लाखो रुपयांचा अपहार करून शासन व जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अन्याय थांबवाः नदाफ बशीरखान यांची मागणी
केंद्र व राज्य शासन गरीबाच्या पोटासाठी असे नदाफ बगरखान यांनी महाले या प्रकरणी त्वरित चौकशी करून फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.