
Sugarcane workers have left for the factory to harvest sugarcane maharashtra farmers
लोहा: यावर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नद्यांना पूर येऊन नदी काठ लगत शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. तर रस्ते पुराने खचले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त अल्पभूधारक शेतकरी, मजूर यांचा काफिला सहकुटुंब ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात रवाना होत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. मात्र आता गाव खेड्यात उरले आहेत ते केवळ वृद्ध मंडळी. यंदा पावसाने तसेच अतिवृष्टी मुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असल्याने बळीराजा पूर्णतः भरडला गेला आहे.
अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ
भरीस भर म्हणून शेतक-यांना शासनाकडून कुठे तुटपुंजी तर कुठे काहीच मदत मिळाली नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. मोठ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी सतत पाऊस होत असल्याने रब्बीचा हंगाम मागे पुढे झाला आहे. परिणामी मजुरांच्या हाताला कामे नाहीत. यावर्षी अल्पभूधारक शेतकरी, मजुरदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने गोरगरीब, अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी कुटुंबे कामाव्या शोधात मोठ्या शहरात तर कांहीं कुटुंबे ऊस तोडणी कामासाठी परजिल्ह्यात व लगतच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात स्थलांतर करत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सण संपताच मजूर कारखान्याच्या दिशेने
वाडी तांड्यावरील असंख्य कुटुंबे घराला कुलूप लावून जात आहेत. नागरिकांचे अनेक काफिले टोळी करून मुकादम यांच्यामागे ऊस तोडणीसाठी जात असल्याचे चित्र असून छोटी गावे, वाडी तांडे येथे केवळ काहीं वयोवृद्ध महिला आणि पुरुष राहिले असल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी सततच्या पावसामुळे शेत शिवारात बऱ्याच दिवसांपासून पाणी साचल्यामुळे उस तोडीचा हंगाम उशिरा सुरु झाला आहे. नोव्हेंबर प्रारंभी साखर कारखान्यांनी कार्यरत होण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी सण संपताच उसतोड मजूर कारखान्याच्या दिशेने रवाना होत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. दैनंदिन तालुक्यातील अनेक गाव खेड्यातून, वस्ती तांड्यातून ट्रक, जीप, ट्रॅक्टर मधून बिन्हाड घेऊन मजुर जात आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहण्याची सोय करण्याची कामे सुरू करा
आजपर्यंत शासन, प्रशासन मार्फत तसेच लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यात कुठलाही मोठा कारखाना, उद्योग धंदे, व्यवसाय निर्माण केला नसल्यामुळे दररोज ग्रामीण भागातील मजुरांचे लोंढे कामाच्या शोधार्थ मेट्रो सिटी कडे धावत आहेत. लोहा तालुक्यात मजुरांना काम नसल्यामुळे व रोजगार हमीचे कामे बंद असल्यामुळे मजुरावर उपासमारीचे वेळ आली आहे. म्हणून तहसीलदारांनी रोहयोची कामे सुरू करून मजुराच्या हाताला कामे द्यावीत अशी मागणी होत आहे.