Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal Election : उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना…

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून अर्ज विक्री सुरु झाली आहे. भाजपकडे इच्छुकांची रांग लागली असून, उमेदवार निवडताना पक्षाच्या नेत्यांना दमछाक करावी लागणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2025 | 11:32 AM
उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना...

उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक, भाजपकडे रांग; इच्छुक उमेदवारांना...

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवार निवडताना नेत्यांची होणार दमछाक
  • इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून अर्ज विक्री सुरू
  • भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी रांग
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून अर्ज विक्री सुरु झाली आहे. भाजपकडे इच्छुकांची रांग लागली असून, उमेदवार निवडताना पक्षाच्या नेत्यांना दमछाक करावी लागणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे इच्छुकांनी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. काॅंग्रेसकडून आजपासून अर्ज विक्री सुरु केली जाणार आहे. इतर पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रीयाही लवकरच राबविली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून तयारी सुरु आहे. प्रभाग रचना, आरक्षण साेडत पार पडली आहे. अंतिम मतदार यादी प्रारुप यादी दुरुस्त करून जाहीर केली जाईल. त्याचवेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज विक्री सुरु केली आहे. भाजपकडून अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता, भाजपकडे इच्छुकांची रांग लागली आहे. अर्ज विक्रीच्या पहील्याच दिवशी भाजपच्या एरंडवणा येथील (डी. पी. राेड ) कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली हाेती. दुपारपर्यंत अडीच हजाराहून अधिक अर्ज नेले गेल्याची माहीती पक्षाच्या कार्यालयातून कळविली आहे.

भाजपकडून अर्ज घेणे आणि दाखल करण्यासाठी दाेनच दिवस मुदत दिली आहे. आज अर्ज घेणे आणि दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट हाेत असून, उमेदवार निवडताना पक्षाच्या नेत्यांना नाराजी कोणी हाेणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आजपासून अर्ज विक्रीस सुरुवात केली आहे. दहा हजार ते पाच हजार रुपये इतकी या अर्जाची किंमत आहे.

काँग्रेसची १३ डिसेंबर शेवटची तारीख

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ ते १३ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. मात्र, शेवटची तारीख म्हणजे १३ डिसेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून, नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने यापूर्वीच विविध पातळ्यांवर बैठक घेऊन प्राथमिक स्तरावर उमेदवारांची चाचणी पूर्ण केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे उमेदवारीसंदर्भातील परिस्थितीही स्पष्ट झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षासमोर नाराजीनाट्य, पक्षांतर यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

ठाकरे सेनेकडे २८० जण इच्छुक

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुणे शहरातील इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत २८० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी दिली. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आली आहे. भ्रष्टाचार, अनियमित कारभार आणि जनविरोधी निर्णयांविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणारा एकमेव पक्ष म्हणून शहरात ठाकरेंच्या शिवसेनेची ओळख निर्माण झाली आहे. अर्ज ११ डिसेंबरपर्यंत स्विकारले जाणार आहेत.

आरपीआयकडून उद्यापासून अर्जवाटप

आरपीआय पक्षाकडून १० ते १३ डिसेंबर या कालावधीत अर्ज वाटप आणि स्वीकृती प्रक्रीया राबविली जाणार आहे. पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, महायुतीसाेबत निवडणुक लढविण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. या बैठकीस शहराध्यक्ष संजय साेनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संघटन सचिव परशुराम वाडेकर आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

Web Title: Applications are being sold by all parties for the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • BJP
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
1

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
2

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
3

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ
4

Rahul Gandhi on RSS: ‘निवडणूक चोरी’ ते ‘RSS चा ताबा’… संसदेत राहुल गांधींच्या भाषणाने मोठा गदारोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.