मुंबई : शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) एक दरोडेखोर (Robber) आहे, तो महाराष्ट्रात कोणत्याही बिळात असता तर महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) त्याला खेचून आणले असते, म्हणून तो घाबरून गुवाहाटीत (Guwahati) बसून धमकी देत आहे, परिवर्तनाचे (Modification) स्वप्न पाहत आहे, असा टोला शिवसेना उत्तर भारतीय कार्यकर्ता परिषदेत महाविकास आघाडी (MVA) सरकारचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शिवसेनेचे बंडखोर (Rebellion) आमदारांना लगावला आहे.
ज्या दिवशी ते मुंबईत येतील त्याच दिवशी निम्म्याहून अधिक आमदार शिवसेना भवनात जातील आणि बाकीच्यांना विमानतळ सोडू दिले जाणार नाही. विमानतळावर (Mumbai Airport) ७२ तास किंवा त्याहून अधिक काळ घेराव घातला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची धारही शत्रूच्या मनात भीती निर्माण करते, मग एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार मुंबईत यायला घाबरतील नाहीतर दुसरे काय करणार, असेही देसाई म्हणाले.
आधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोरांचे ४० मृतदेह गुवाहाटीतून येतील, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर वादंग उठल्यानंतर त्यांनी मी त्यांचा आत्मा मेला आहे, यामुळे त्यांना जिवंत प्रेते म्हणालो असे स्पष्टीकरण दिले. यानंतर आता सुभाष देसाई यांच्या या धमकीचीही चर्चा सुरू झाली आहे.