Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi wari 2025 : देहूनगरीमध्ये पालखीची लगबग सुरु; वारकऱ्यांच्या सोयीसुविधा अन् सुरक्षेबाबत आढावा बैठक पार

Ashadhi wari 2025 : लवकरच आषाढी वारी सोहळा सुरु होणार आहे. यासाठी प्रशासनाची आणि मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. देहूमध्ये आढावा बैठक पार पडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 01, 2025 | 12:03 PM
Ashadhi Wari sohola 2025 Complete Planning and Review Meeting in Dehu

Ashadhi Wari sohola 2025 Complete Planning and Review Meeting in Dehu

Follow Us
Close
Follow Us:
देहूगाव : राज्यामध्ये लवकर पालखी सोहळा सुरु होणार आहे. यासाठी देहू आणि आळंदीमध्ये तयारी सुरु झाली आहे. श्री संत तुकाराम महाराज यांचा 340 वा आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान  सोहळ्याची तयारी सुरु आहे. या अनुषंगाने वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या  सोयीसुविधा व  सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंदिराच्या दर्शन सभागृहात आढावा बैठक पार पडली. उपजिल्हाधिकारी डॉ.यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली या पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस डॉ.यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख,श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख,दिलीप महाराज गोसावी तसेच सर्व विभागाचे  शासकीय अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

देहूगाव ते देहूरोड पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत

वारकरी चालत जाणाऱ्या देहूरोड या पालखी मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, नियमबाह्य  आणि अनावश्यक असलेले गतिरोधक काढावेत ,असा मुद्दा देहू देवस्थान संस्थानने उपस्थित केला. यावर पालखीपूर्वी लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवणे ,साईट पट्टे भरून घेणे अशी कामे केले जातील असे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

देहू ते देहूफाटा (येलवाड़ी ) दरम्यान असल्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असून खूपच वाईट दुरावस्था या रस्त्याची झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून त्वरित डागडुजी करून घ्यावी अशी सूचना माने यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी मार्गावर पहिली अभंग आरती अनगडशहावली बाबा दर्ग्याजवळ कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे  दुरुस्त करणे,वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठा ,शुद्ध पाणीपुरवठा या संदर्भातील प्रश्न या बैठकीत  उपस्थित करण्यात आले.
अखंड विद्युत पुरवठा,पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे,आरोग्याच्या दृष्टीने संसर्गजन्य परिस्थिती पाहता त्याच्या उपाययोजना, औषधोपचार करणे ,स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणे,सोहळा मार्गस्थ होताना पालखी रथ  व वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी व शासकीय विभागाने समन्वय साधून रस्त्या वरील खड्डे त्वरित बुजवणे,दुतर्फा मुरूम टाक़णे,अचानक उदभवणाऱ्या आपत्ती काळात पूर्वनियोजन  करणे,सुरक्षितच्या दृष्टीने वाहतूकीचे ,मुक्काम स्थळी विद्युत व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे,पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त लावणे ,सीसीटीव्ही कॅमेरे  बसविणे,नियंत्रण कक्ष तयार करून सर्व विभागातील अधिकारी,पदाधिकारी कर्मचारी यांचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला उपजिल्हाधिकारी डॉ यशवंत माने यांनी यावेळी  दिल्या.

देहूनगर पंचायतीची तयारी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने येत्या १० जूनपूर्वी पूर्व नियोजन केले जाईल. यामध्ये देहूच्या अतिक्रमण विभागाकडून महत्वाच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस विभाग व  वैदयकीय पथकासाठी खुर्च्या,टेबल मंडप उभारणे, स्पीकर सिस्टीम पुरवणे ,इंद्रायणी नदीच्या दोन्ही घाटावर महिलांसाठी चेंजिंग रूप उभारणे , देहू शहरातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करणे,देहूतील सार्वजनिक शौचलयांची दुरुस्ती करणे अशी कामे केली जाणार आहेत.

विभागाप्रमाणे करण्यात येणारी कामे

आरोग्य विभाग

शहरात एकूण ६३ व अतिरिक्त १५ कर्मचाऱ्यांन मार्फत साफसफाई व कचरा संकलन करणे ,मंदीर परिसरात पाच कर्मचारी साफसफाई करिता तैनात करणे , धडक पथकाद्वारे प्लास्टिक विक्री रोखणे, प्लास्टिक वापर टाळणे बाबत जनजागृती करणे, 500 दिंड्याना प्लास्टिक वापर टाळणे बाबत पत्र देणे, नानासाहेब धर्माधिकारी व देहू शहरातील इतर संस्थेमार्फत प्लास्टिक मुक्त वारीचे नियोजन करणे, इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढणे, स्वच्छतेच्या दृष्टीने शहर व परिसरात जंतूनाशक व धूर फवारणी करणे, देहूत येणाऱ्या सर्व दिंड्याना नगरपंचायत मार्फत मेडीकल किटचा पुरवठा करणे. यात्रा कालावधीमध्ये एकूण दहा ठिकाणी पुणे जिल्हापरिषद मार्फत 1200 अतिरिक्त फिरते शौचालये उपलब्ध करून देणे, या त्याची निगराणी ठेवणे, अशी कामे केली जाणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाणी पुरवठा
शहरात दोन वेळा दोन तास पाणी पुरवठा करणे, जवळ पास बारा ठिकाणी 12 पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध असणार असून दिंड्या करिता पाच फिरत्या टँकर द्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा होणाऱ्या भागात स्वतंत्र टँकरची सुविधा, पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व मोटारी व यंत्रणा सुस्थित ठेवणे ,जल शुद्धीकरण करण्यासाठी टी. सी.एल.पावडर , गॅस क्लोरीनेटर व इतर आवश्यक रसायनांचा पुरेसा साठा उपलब्द करून देण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन 
वारी काळात एकूण तीन अग्निशमन वाहने ठेवण्यात येणार आहेत. इंद्रायणीच्या नदीकाठी भाविकांच्या सुरक्षितते करीता एन.डी. आर. एफ.ची टीम तैनात करणे. देहूनगर पंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करून त्या ठिकाणी विविध भागाचे प्रतिनिधी उपलब्द करून देणे, शहरात विविध गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याचे कंट्रोलरूम देहू पोलीस स्टेशन असणार आहे. महत्वाच्या 18 ठिकाणी फ्लड लाईट बसवणे, रस्त्यावरील विद्युत पोलवरील लाईट दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून अतिरिक्त प्रकाश व्यवस्था एल.ई.डी. तसेच फ्लड लाईट बसवणे ,पाणी पुरवठा जल शुद्धीकरण केंद्राकडील विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी जनरेटर बसवन्यात येणार आहे. तसेच या काळात मुक्कामी असणाऱ्या दिंड्याना अवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था निर्माण करून देणे.
फ्लेक्स बोर्ड लावणे
आषाढी यात्रा कालावधीत लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक भक्त येत असतात.त्या अनुषंगाने शहरात असलेले विविध सार्वजनिक शौचालये , वाहनतळ सुविधा , नो पार्किंग फलक , सूचना फलक ,जनजागृती फलक , पोलिस विभागाच्या मागणी प्रमाणे  मार्गदर्शक फलक तयार करून लावण्यात येणार आहेत.

Web Title: Ashadhi wari sohola 2025 complete planning and review meeting in dehu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Dehuroad
  • Saint Tukaram Maharaj Palkhi

संबंधित बातम्या

Pune Road Conditions : एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार का? देहूरोडच्या त्रस्त नागरिकांचा सवाल
1

Pune Road Conditions : एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार का? देहूरोडच्या त्रस्त नागरिकांचा सवाल

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय
2

तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा
3

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न
4

Ashadhi Wari 2025: वरुणराजाच्या उपस्थितीत माऊलींचा परतीचा प्रवास सुरू; पादुकांना नीरा स्नान संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.