मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपले पत्ते उघडताना दिसत आहेत. भाजप आणि अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार आपली एक एक चाल खेळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधातच शरद पवारांनी आपला मोर्चा उघडला आहे.
अजित पवार आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच शरद पवारांनी सुरूंग लावायला सुरूवात केली आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. याचे कारण म्हणजे, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी दीड महिन्यापूर्वीच शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अश्विनी जगताप भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चा चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा: चंद्राचा एखादा भाग तुटला तर त्याला पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागेल? जाणून घ्या काय
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी जगतापांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचा हा डाव भाजपला आणि अजित पवारांनाही महागात पडू शकतो. त्यामुळे अश्विनी जगताप लवकरच कमळ सोडून हातात तुतारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या