Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asaduddin Owaisi : चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

भाजप नेते नवनीत राणा यांच्या चार मुले असल्याच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. ओवैसी यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि चंद्राबाबू नायडू यांच्या अधिक मुले असल्याच्या विधानांवरही निशाणा साधला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 06, 2026 | 11:13 AM
चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • चार नाही आठ मुले जन्माला घाला
  • ओवैसींचा नवनीत राणांवर टोला
  • प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी
अमरावती : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादाने आता नागरिकत्व, संविधान आणि राष्ट्रनिष्ठा अशा संवेदनशील विषयांपर्यंत मजल मारली आहे.

एआईएमआईएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप नेते नवनीत राणा यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये राणा यांनी देशाची लोकसंख्या सुधारण्यासाठी हिंदूंना किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. राणा म्हणाले होते की, पाकिस्तानसारखी परिस्थिती टाळण्यासाठी भारताची लोकसंख्या वाढविण्यासाठी हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत, याच विधानावर ओवैसी यांनी टीका केली आहे.

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

काही दिवसांपूर्वी राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत, ‘जर ते १९ मुले जन्माला घालत असतील, तर हिंदूंनीही किमान ३-४ मुले जन्माला घातली पाहिजेत, असे विधान केले होते. या वक्तव्यावरून टीका करताना ओवैसी यांनी प्रचारसभेत जोरदार टोला लगावला. प्रचारसभेत बोलताना ओवेसी म्हणाले, ‘मोहन भागवत म्हणतात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घाला, राणा म्हणतात, चार मुले जन्माला घाला. मी सांगतो, तुम्ही चार नाही तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणघेण नाही. पण द्वेषाचे राजकारण थांबवा. या प्रकारच्या विधानांमुळे जनतेचे लक्ष महागाई, बेरोजगारी, नागरी समस्या यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकीकडे महापालिका निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना, दुसरीकडे अशा वक्तव्यांमुळे आक्रमक अमरावतीतील राजकीय वातावरण अधिकच चिघळत असल्याचे चित्र आहे. या वादाचा मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता
सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांवरही बोचरी टीका

ओवैसी यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरही निशाणा साधत, ‘जे आपल्या काकांचे झाले नाही, ते तुमचे काय होणार?’ असा सवाल उपस्थित केला. ‘घड्याळाची वेळ संपली असून आता पतंग उडवण्याची वेळ आली आहे,’ असे म्हणत एमआयएम उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ओवैसीला पाकिस्तानात पाठवा : राणांचे प्रत्युत्तर

ओवैसीच्या वक्तव्यावर राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, असदुद्दीन ओवैसी है खासदार आहेत, पण ते संविधानाबद्दल का बोलत नाहीत? भारतात राहून भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणायला यांना लाज वाटते. पुढे जात त्यांनी, ओवैसी यांचे भारतीय नागरिकत्व काढून त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. तिथे जाऊन दहा-वीस मुले जन्माला घातली, तर कुणी विचारणारही नाही, अशी बोचरी टीका केली. घुसखोरी, लोकसंख्या वाढ, पश्चिम बंगाल, आसाम, मुंबई, दिल्ली, तेलंगणा आदी राज्यांमधील परिस्थितीवर बोलण्याचे आव्हान देत, भारतामध्ये राहायचे असेल, तर संविधानाचा आणि राष्ट्राचा सन्मान करायलाच हवा, असेही राणा म्हणाल्या.

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Web Title: Owaisi mocks bjp leader navneet rana four children remark manickam tagore aimim congress india population news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Asaduddin Owaisi
  • BJP
  • Navneet Rana

संबंधित बातम्या

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही’; कायदा-सुव्यवस्थेवरून सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ
2

मोठी बातमी! भाजप आणि शरद पवार गटाची हातमिळवणी; महायुतीत जाण्याच्या चर्चांना बळ

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
3

‘दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?’ शरद पवारांच्या NDA चर्चांवर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
4

अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.