Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bachchu Kadu : “हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडूंचं आव्हान

“ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं”, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 24, 2025 | 10:16 PM
“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडूंचा इशारा

“हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, बच्चू कडूंचा इशारा

Follow Us
Follow Us:

दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. पण या साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एक गंभीर आरोप केला. “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं”, असं विधान नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. एवढंच नाही तर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत नीलम गोऱ्हे यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं. दरम्यान, यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली आहे. “हिंमत असेल तर नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा”, असा इशारा त्यांनी माध्यमांसमोर दिला आहे.

“शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाड्या दिल्या असतील तर कोणत्या क्रमांकाच्या दिल्या ते त्यांनी सांगितलं पाहिजे. खरं तर नीलम गोऱ्हे यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत. त्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलल्या म्हणून मी बोलत नाही. मात्र, कोणत्याही नेत्यांना कोणत्याही नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल तर काही संदर्भ किंवा काही पुरावे दिले पाहिजेत. पण कोणतेही पुरावे न देता आपण बोलत असू तर ते योग्य नाही”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

“नीलम गोऱ्हेंनी केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं, यापेक्षा…”

“तसेच जर नीलम गोऱ्हे यांनी जर उद्धव ठाकरे यांना गाडी दिली असेल तर कोणती गाडी दिली ते सांगावं. गुन्हे दाखल करावेत. नीलम गोऱ्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत. मात्र, जर खरंच उद्धव ठाकरे यांनी गाड्या घेतल्या असतील तर नीलम गोऱ्हे यांनी रणरागिणी सारखं समोर आलं पाहिजे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

“कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.

Web Title: Bachchu kadu reaction on neelam gorhe statement mercedes cars uddhav thackeray politics marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • bachu kadu
  • Dr. Nilam Gorhe
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.