भाजपला धक्का ! ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'या' नेत्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहेत. अनेक नेतेमंडळी पक्ष बदलताना दिसत आहेत. त्यातच ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला पुण्यात धक्का बसल्याचे बोलले जात आहे. माजी आमदाराने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेदेखील वाचा : भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात प्रवेश; धर्मरावबाबा आत्राम यांची खेळी की आणखी काही…
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यानुसार, नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराबाबत चाचपणी सुरु आहे. त्यात भाजपचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बापूसाहेब पठारे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील एका गणेश मंडळात नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविणार आहोत आणि तुतारीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या भागात असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळ यांना सांगा की, तुतारीला मतदान करावे, असे आवाहन केले होते.
बापूसाहेब पठारे ‘सिल्व्हर ओक’वर
बापूसाहेब पठारे यांनी थेट मुंबई गाठून शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, माजी नगरसेवक भय्यासाहेब जाधव हे उपस्थित होते. शरद पवार गटात बापूसाहेब पठारे यांनी प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघातून शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
हेही वाचा: Delhi New CM : आतिशी होणार दिल्लीचे नवे मुख्यमंत्री, 11 वर्षांनंतर एक महिला राजधानीची कमान सांभाळणार