Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीतल्या बॅनर्सची पुन्हा चर्चा; सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा,अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महायुतीत  एकनाथ शिंदे, देंवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चाआहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 22, 2024 | 11:15 AM
बारामतीतल्या बॅनर्सची पुन्हा चर्चा; सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार
Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्य विधानसभा निवडणुकांना काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. राजकीय पक्षांकडे इच्छुकांचा रांगा लागल्या आहेत, राजकीय पक्षांचे दौरे, सभा, बैठका, मेळावे सुरू आहेत. राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. अशातच बारामतीत लागलेल्य बॅनर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनर्सवर सुप्रिया सुळे  या भावी मुख्यमंत्री तर युगेंद्र पवार फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेआहेत. या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर ‘सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार’अशायाचा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आला आहे. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हे बॅनर लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही राज्यातील जनतेचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. त्यामुळेच बारामतीत लागलेले पोस्टर्सची सध्या चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: कर्नाटक सरकारचा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’कठीण दिवसांत मिळणार पगारी सुट्टी

महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा,अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे महायुतीत  एकनाथ शिंदे, देंवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चाआहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जंयत पाटील, सुप्रिया सुळे यांच्याही  नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पण या चर्चा सुरू असताना जर सर्वांत शांत कोणी असेल तर शरद पवार. राज्यातील सहा प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू असली तरी शरद पवार यांनी मात्र अद्याप आपल्याकडून कोणाचेही नाव प्रसिद्ध केलेले नाही. किंबहुना मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही.आधी महायुतीची सत्ता घालवून आणि मगच मुख्यमंत्री ठरवू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.

हेही वाचा: कसा असेल राष्ट्रवादीचा तिकीटवाटपाचा ‘फॉर्म्युला’? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर शरदपवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.  विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार हे पहिल्यांदाच आमदार होणार आहेत. त्यामुळए सुप्रिया सुळेंना अशा आमदारांचे समर्थही मिळू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. पण आता तशी स्थिती नाही, सुप्रिया सुळे यांच्यासाठी मार्ग मोकळा आहे. विशेष म्हणजे,  राष्ट्रवादीतील इतर ज्येष्ठ नेते जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाडहेदेखी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करतील, असे दिसत नाही.त्यामुळे सध्या तरी सुप्रिया सुळेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Baramati supriya sule future chief ministerial banners discussed in political circles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
1

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.