Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. अजित पवार हयात असताना विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 08:50 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:
  • सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान
  • ‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विषय संपला’ – सुप्रिया सुळे
  • अजित पवारांच्या निधनानंतर चर्चांना पूर्णविराम?
 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातील नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला होता. मात्र, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादा हयात असताना विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. (NCP Merger)

विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही!

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशीही याबाबत कोणी चर्चा केलेली नाही. शरद पवार यांना अनेक लोक भेटत असतात. त्यात काही नवीन किंवा चुकीचं नाही. अजित पवार यांचा गट वेगळा झाला होता, तेव्हाही अनेक नेते पवारसाहेबांना भेटत होते.

दुसऱ्या पक्षात काय सुरू आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यात आपण कशाला लक्ष घालायचं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Shivsena Merger : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले संकेत!

‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विषय संपला!’

सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी मी या विषयावर पडदा टाकला. दादा होते तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही काय करणार आहोत, हे जगाला माहिती होतं. पण माझा भाऊ गेला आणि विषय संपला, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवा संदर्भ मिळाला आहे.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या विधानांमुळे चर्चा

दरम्यान, अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अलीकडे विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला होता.

दोन्ही राष्ट्रवादींच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांनी कोणताही अधिकृत प्रस्ताव आल्याचं नाकारलं आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सध्या तरी कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. दोन्ही गटांचे वरिष्ठ नेते पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

    Ans: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही आणि याबाबत कोणीही आपल्याशी चर्चा केलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

  • Que: 'माझा भाऊ गेला, विषय संपला' असं सुप्रिया सुळे का म्हणाल्या?

    Ans: अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आपण या विषयावर पडदा टाकल्याचं सुप्रिया सुळे यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.

  • Que: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा का सुरू झाल्या?

    Ans: अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली.

Web Title: Supriya sule statement ncp merger ajit pawar death vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट
1

Supriya Sule: ‘दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं…’; भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळेंची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!
2

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!
3

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान
4

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.