Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड-नगर रेल्वेला अखेर मुहूर्त मिळाला; 17 सप्टेंबरला धावणार रेल्वे, नागरिकांना मोठा फायदा होणार

बीड-नगर या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2025 | 08:18 AM
बंगळूर-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

बंगळूर-मुंबई दरम्यान मिरजमार्गे नवी सुपरफास्ट एक्सप्रेस धावणार; प्रवाशांना होणार मोठा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन दरवर्षी साजरा केला जातो. मात्र, यंदाचा हा दिवस बीड जिल्ह्यासाठी खास राहणार आहे. त्यांचे एक मोठे स्वप्न त्या दिवशी पूर्ण होणार आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-अहिल्यानगर डेमू रेल्वे सेवेचा लवकरच शुभारंभ या दिवशी होत आहे. या रेल्वे सेवेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

बीड-नगर या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल. ही डेमू रेल्वे १६८ किलोमीटरचा प्रवास अंदाजे ५ तास आणि ३० मिनिटांत पूर्ण करणार आहे. कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बीडकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प मागील वर्षांत वेगाने पूर्ण करण्यात आला.

आता केंद्रातील नरेद्र मोदी सरकार स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे याद्वारे स्वप्न पूर्ण करत आहे. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य रेल्वे स्थानक आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. बीड ते अहिल्यानगर या मार्गावर एकूण १६ स्टेशनवर ही रेल्वे थांबणार आहे.

या स्टेशनवर थांबणार रेल्वे

बीड, राजुरी, रायमोह, विगणवाडी, घाटनांदुर, अंमळनेर, बावी, किन्ही, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी लोणी, नारायणडोह व अहिल्यानगर.

लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार

मराठवाडा मुक्ती संग्रामदिनापासून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात होईल. या रेल्वे सेवेमुळे बीड आणि अहिल्यानगर या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होणार आहे. आतापर्यंत बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळेल.

बीड-नगर तिकीट ४० रूपये

व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि इतर सर्व वर्गांना या सेवेचा थेट लाभ होईल. ही केवळ एक वाहतूक सुविधा नसून, दशकानुदशके जपलेल्या बीडकरांच्या स्वप्नाची पूर्तता आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. बीड – नगर तिकीट ४० रूपये राहणार आहे.

Web Title: Beed nagar railway finally will run on september 17 citizens will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Railway News

संबंधित बातम्या

दहावी पात्र उमेदवारांसाठी रेल्वेत जागा रिक्त! आजच करा अर्ज आणि मिळवा नियुक्ती
1

दहावी पात्र उमेदवारांसाठी रेल्वेत जागा रिक्त! आजच करा अर्ज आणि मिळवा नियुक्ती

Train Ticket Rule : रेल्वेच्या नियमात मोठा बदल! तिकीट रिझर्व्हेशनबाबत महत्त्वाचा निर्णय
2

Train Ticket Rule : रेल्वेच्या नियमात मोठा बदल! तिकीट रिझर्व्हेशनबाबत महत्त्वाचा निर्णय

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?
3

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.