बीड : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून, या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळेचा तपास अद्यापही सुरूच आहे. असे असतानाच संतोष देशमुखांच्या घरातून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या महिलेने आपल्याकडे कृष्णा आंधळे संदर्भात महत्त्वाचे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री संतोष देशमुख यांच्या घरी एक अज्ञात महिलेने प्रवेश केला. रात्रभर घराबाहेर असलेल्या मंडपात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा आग्रह धरला, ज्यामुळे देशमुख कुटुंबात काही काळ गोंधळाची आणि संशयाची स्थिती निर्माण झाली होती.
Crime News: दौंडमध्ये मोबाईल विक्रीचे दुकान फोडून ५७ हजाराचा ऐवज लंपास
यासंदर्भात बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, मला कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, एक महिला रात्री घरी आली, रात्रभर मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अंघोळीसाठी देशमुख यांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी हट्ट धरला. दुसऱ्या बाथरूची सोय करून दिल्यानंतरही तिल आमच्याच घरातील बाथरूम मध्ये अंघोळ करायची असल्याचा तिने हट्ट धरला. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो. माझ्याकडे त्याच्याशी संबंधित अनेक पुरावे आहेत, असा दावाही तिने सुरू केला. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं. पण पोलिसांसमोर मात्र तिने आपल नावही सांगण्यास नकार दिला.
ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून तिची चौकशी सुरू आहे. तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात आल्यामुळे आम्ही गावकरी आणि पोलिसांना कळवलं होतं. दुसरीकडे रत्नागिरी पोलिसांकडेही याबाबत माहिती घेतली असता. रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेनं इथं तशा प्रकारच्या तक्रारी दिल्याचे सांगितले. तसेच, आम्ही या महिलेच्या दाव्यांची शहानिशा करत असल्याच रत्नागिरी पोलिसांनी म्हटलं आहे.